नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , गंगाझरी पोलिसांचा लेंडेझरी स्मशान भुमी बंधाऱ्यावर मोहफुलाची हातभट्टी दारू काढणाऱ्यावरती छापा २९,८००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त. – जनता टाइम्स न्यूज

गंगाझरी पोलिसांचा लेंडेझरी स्मशान भुमी बंधाऱ्यावर मोहफुलाची हातभट्टी दारू काढणाऱ्यावरती छापा २९,८००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

गंगाझरी पोलिसांचा लेंडेझरी स्मशान भुमी बंधाऱ्यावर मोहफुलाची हातभट्टी दारू काढणाऱ्यावरती छापा २९,८००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त.

महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)

गोंदिया :-  पोलीस स्टेशन गंगाझरी  ग्राम लेंडेझरी येथील  स्मशान भुमी  बंधारा नाला येथे एक इसम अवैधरित्या मोहफुलाची हातभट्टी दारु तयार करीत असल्याची माहिती ठाणेदार महादेव तोदले यांना मिळाल्याने पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर , श्री.विजय भिसे SDPO आमगाव यांच्या मार्गदर्शनामध्ये पो.स्टे गंगाझरी हददी मधील मौजा लेंडेझरी स्मशान घाट, बंधारा नाला ता. गोंदिया येथे ठाणेदार पोलीस स्टेशन गंगाझरी यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली मौजा लेंडेझरी स्मशान घाट, बंधारा नाला  येथे दि. २७/११/२०२२ रोजी मोहफुल दारू भट्टीवर छापा टाकण्यात आला तेव्हा तिथे दोन जर्मन करच्या, सडवा रसायन मोहफुल, हातभट्टी दारु व इतर साहीत्य असा एकुण २९८००/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला आहे.

आरोपी नामे जिवराज रामलाल कोहाची वय ३३ वर्ष, रा लेंडेझरी ता. गोरेगाव  ता. जि. गोंदिया – यांचेवर पोलीस स्टेशन गंगाझरी येथे अप. क्र.  ३५५/ २०२२ कलम ६५  (ब)(क)(ड)(ई)(फ) महाराष्ट्र दारु बंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही वरीष्ठांचे निर्देश व आदेशान्वये ठाणेदार पोलीस निरीक्षक महादेव तोदले, पोलीस हवा. भरत पारधी ब . न १६१४ , पो. शि. जितेन्द्रसिग बघेल बं.नं.१८२५ यांनी केली आहे.


Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now