मणिपूर इथे महिलांवर झालेल्या क्रूर व अमानवीय हिंसाचाराच्या, हुकूमशाही राजवटीच्या निषेधार्थ* शासनास निवेदन देण्यासाठी सर्व जनतेला *दि.28 जुलै* तिरोडा येथे उपस्थित राहण्याचे आव्हाहन

Kochi: People take out a silent march praying for peace and harmony in Manipur, in Kochi, Sunday, June 25, 2023. (PTI Photo)(PTI06_25_2023_000249A)
|


महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
तिरोडा :- सर्व समाज बांधवाना आव्हाहन करण्यात येत आहे की, मणिपूर इथे महिलांवर झालेल्या क्रूर व अमानवीय हिंसाचाराच्या व हुकुमशाही राजवटीच्या निषेधार्थ विविध सर्व प्रमुख न्याय मागण्यासह सामाजिक संघटनांच्या वतीने तहसीलदार मार्फत दिनांक 28/07/2023 ला दुपारी 12:00 वाजता तहसील कार्यालय, तिरोडा इथे निषेध व न्याय मागण्यांचे निवेदन शासनास देण्यात येत असल्याने निमंत्रणाची वाट न बघता सामाजिक दायित्व समजून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, तिरोडा इथे सकाळी ठीक 11.00 वाजता वेळेवर उपस्थित रहावे असे आव्हाहन *संविधान मैत्रिय संघ तिरोडा*, सर्व समाज विचारमंच, तिरोडा , बिरसा फाइटर तालुका तिरोडा, ओबीसी महासंघ तालुका तिरोडा, संभाजी ब्रिगेड तालुका तिरोडा, महाप्रज्ञा बुद्ध विहार समिती, तिरोडा बुद्धिस्ट इंटरनेशनल संघ तिरोडा, भारतीय बौद्ध महासभा, तिरोडा सुशिक्षित बेरोजगार संघटना, तिरोडा संत रविदास चर्मकार सेवा संघटना, गुलामे मुस्तफा यंग मुस्लिम कमेटी ता. तिरोडा, जि. गोंदिया, महाराष्ट्र यांनी केले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
