*माजी खासदार तुमानेजींनी श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांवर बिनबुडाचे आरोप करू नये – माजी आमदार डी. मल्लिकार्जून रेड्डी*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*माजी खासदार तुमानेजींनी श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांवर बिनबुडाचे आरोप करू नये – माजी आमदार डी. मल्लिकार्जून रेड्डी*
राजु कापसे / विदर्भ प्रमुख प्रतिनिधी
रामटेक : नुकत्याच झालेल्या रामटेक लोकसभा मतदार संघाचा निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार राजु पारवे यांचा पराभव झाला. या पराभवानंतर माजी खासदार कृपालजी तुमाने यांनी आमचे नेते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांवर बिनबुडाचे आरोप करून बावनकुळेनीच आपली उमेदवारी कापली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तुमानेचा आरोपांनी रामटेक विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी व समस्त कार्यकर्ते व्यथित झाले असून शिवसेनेची (शिंदे गट) उमेदवारीचा व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचा संबंध तरी काय असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. भाजपा – शिवसेनेची (शिंदे गट) महायुती असली तरी उमेदवार निश्चित करण्याचा अधिकार हा पक्षाचा आहे. शिवसेनेने महाराष्ट्रात 15 लोकसभेचे उमेदवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरविले. त्यात त्यांनी उमरेडचे आमदार राजु पारवे यांना उमेदवारी दिली त्यात बावनकुळे साहेबांचा संबंध तरी काय असा सवाल आम्हाला निर्माण झालेला आहे. भाजपचा तुलनेत शिवसेनेकडे (शिंदे गट) लोकप्रतिनिधींची संख्या कमी आहे. तरी सुद्धा तुमानेजींचा 2014 व 2019 च्या निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा नेतृत्वात भाजप कार्यकर्ते व पदाधीकारी यांनी जोरदार किल्ला लढवत विजय खेचून आणला होता. या निवडणुकीत त्यांचा विरोधात मतदारसंघात प्रचंड जनमानस होते. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्यांची उमेदवारी कापून पारवेना दिली असेल. मागील दोन निवडणुकीत मोदीजींचा नावावर मत मागून निवडून येणाऱ्या तुमानेंनी बावनकुळे साहेबावर टीका करण्यापेक्षा स्वतः आत्मचिंतन करावे 2024 च्या निवडणुकीत रामटेक लोकसभा भाजपाला देण्यात यावी याकरिता आमचे सर्व नेते व आम्ही आग्रही होतो. रामटेक लोकसभा क्षेत्रातील सर्व बुथवर भाजपाची संघटन बांधणी झालेली होती. भाजपाच रामटेक लोकसभा लढावी अशी सर्व भाजप कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व जिल्हाध्यक्ष सुधाकरजी कोहळे यांचा नेतृत्वात मोर्चेबांधनी केली. रामटेक लोकसभेची सीट ही भाजपाच्या कोट्यात आली असती तर आज चित्र वेगळे असते जिल्ह्यात भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संख्या मोठी असून भाजपाच्या लोकप्रतिनिधी सरपंच, नगरसेवक, जी.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य यांची संख्या शिवसेनेपेक्षा अधिक आहे. भाजपा हा रामटेक विधानसभेत जनमानसात रुझलेला पक्ष आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत रामटेक विधानसभेत भाजपाने मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. युतीच्या वाटाघाटीत 2019 मध्ये सुद्धा रामटेक विधानसभा भाजपच्या वाटेला आलेला होता. त्यामुळे भाजप उमेदवाराच्या विरोधात असंतृष्ट लोकांनी मदत केली व अपक्ष उमेदवार निवडून आले. करिता पक्षश्रेष्ठिणी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भावना लक्षात घेता रामटेक विधानसभेची जागा भाजपानेच लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space