मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शांततापूर्ण वातावरणात संपन्न
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शांततापूर्ण वातावरणात संपन्*
————————————-
*निवडणूक कार्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार*
*दिनांक 19 ऑक्टोबर 2024*
*जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
उमरेड:-मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक 2018/767/18/33 तथा मा. केंद्रीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडे अधिसूचना दि. 15 ऑक्टोबर 2024 अन्वय जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय नागपूर अंतर्गत आगामी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक 2024 च्या कार्यक्रमाची घोषणा केलेली असून सदर कार्यक्रमाच्या अधीन राहून निवडणुकीबाबतचे प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा नुसार दि. 19 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2024 या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील दीनदयाल उपाध्याय सभागृह येथे नुकतेच पहिले निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम शांततेत पार पडले आहे.
सदर मतदान प्रशिक्षण पहिल्या टप्प्यात 19 ऑक्टोबर ला प्रेसिंडिंग ऑफिसर तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 20 ऑक्टोबरला इतर पोलिंग ऑफिसर पदनामावर प्रति नियुक्त झालेल्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण भिवापूर तालुक्याचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट तथा उमरेड चे तहसीलदार राठोड साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाद्वारे शांत पूर्ण वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीत पार पडला.
यावेळी प्रशिक्षणा दरम्यान अल्प प्रमाणात झालेले मतदान साहित्य तथा यंत्रसामुग्रीतील बदलावर येथोचित मार्गदर्शन तथा कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर निराकरण करण्यात आले.
तसेच मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या प्रेसाईडिंग ऑफिसर तथा मतदान अधिकारी द्वारे होणाऱ्या कार्यप्रणालीत कुठल्याही प्रकारचां कसूर होणार नाही आणि झाल्यास सदर मतदान अधिकाऱ्यांवर तथा संबंधित मतदान पथकावर कठोर कारवाई होण्याची तंबी देखील यावेळी प्रामुख्याने देण्यात आली हे मात्र विशेष.
याप्रसंगी प्रशिक्षणाला उपस्थित झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तथा इतर विभागातील कर्तव्य मतदार संघात तथा संघाबाहेर निवासी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेसाठी फॉर्म नमुना 12 आदेशासोबत देण्यात आला असून यावेळी प्रथमतःच ईडीसी अर्थात निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र बाद केले असल्याचे समजते .
यावेळी मतदान प्रशिक्षणार्थ्यांनी टपाल मतपत्रिके च्या आणि बँक खात्याचे ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तोबा गर्दी केली होती.प्रशिक्षणाच्या वेळी निवडणूक ओळखपत्राचे झेरॉक्स प्रत अर्जात मतदार यादी मधील अनुक्रमांक व यादीच्या भाग क्रमांक अचूक पने नमूद करून संबंधित टेबलवर सादर करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागले.
तसेच विशेष बाब म्हणून निवडणूक कार्यात नियुक्त झालेल्या मतदान अधिकाऱ्यांना यावेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील मानधन रोख स्वरूपात मिळणार नसून तो त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने यावेळी संबंधित टेबलवर मतदान अधिकाऱ्यांचे ऑनलाईन बँक खात्याचे रजिस्ट्रेशन करण्यात आले असल्याचे समजते.
तसेच आरोग्याच्या कारणाने अक्षम असलेल्या अधिकाऱ्यांना मतदान कार्यासाठी देण्यात आलेले नियुक्ती आदेश रद्द करण्याचे अधिकार प्रथमताच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडून सांगण्यात आल्याने काही निवडक प्रशिक्षणार्थी मध्ये एकच तारांबळ उडाली.
आरोग्याच्या विविध कारणाने पीडित असलेल्या प्रशिक्षणार्थी मतदान अधिकाऱ्यांनी सदर कामापासून त्यांना मुक्त करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिलेला नियुक्ती आदेश सहानुभूतीपूर्वक रद्द करण्याची मागणी देखील काही पीडित प्रशिक्षणार्थी मतदान अधिकाऱ्यांनी यावेळी केली आहे.
सदर प्रशिक्षणात मतदान यंत्र अचूकपणे सांभाळण्यासाठी सराव प्रशिक्षण देखील मतदान अधिकाऱ्यांना देण्यात आला.
यावेळी बहुसंख्या स्त्री- पुरुष प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, तथा व्हीव्हीपॅट यंत्र प्रत्यक्षात हाताळून प्रात्यक्षिक केले.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space