नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , विजयभाऊ रहांगडाले यांनी प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थित बैलगाडी वर रॅली काढत भाजपा कडून केला उमेदवारी अर्ज दाखल – जनता टाइम्स न्यूज

विजयभाऊ रहांगडाले यांनी प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थित बैलगाडी वर रॅली काढत भाजपा कडून केला उमेदवारी अर्ज दाखल

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

विजयभाऊ रहांगडाले यांनी प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थित बैलगाडी वर रॅली काढत भाजपा कडून केला उमेदवारी अर्ज दाखल.

 

महेंद्र नंदागवळी

मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)

तिरोडा :- तिरोडा/गोरेगाव विधानसभा क्षेत्र क्रमांक-64 येथे भारतीय जनता पार्टी कडून विजयभाऊ रहांगडाले यांनी 28/10/2024 ला मातोश्री लॉन तिरोडा येथे भव्य सभा घेऊन मातोश्री लॉन पासून ते तहसील कार्यालया पर्यंत बैलगाडी वर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते प्रफुल पटेल यांच्यासह, माजी खासदार सुनिलमेंढे, पंकज रहांगडाले जिल्हापरिषद अध्यक्ष, पिंटूभाऊ रहांगडाले कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा, जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावन्थडे व असंख्य पदाधिकारी यांनी सवारी करून हजारोच्या संख्येत कार्यकर्त्यांनी जयश्रीराम चे जय घोष करत वाजत-गाजत कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन करुन विजयभाऊ रहांगडाले यांनी उमेदवारी अर्ज तहसील कार्यालय तिरोडा येथे दाखल केले.

नामांकन दाखल केल्यानंतर विजयभाऊ रहांगडाले यांनी माध्यमांना सांगितले की युती सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे झालेली आहेत, सुरु आहेत, भारतीय जनता पक्ष महायुती म्हणून जनतेसमोर जाणार आहेत मतदाता हे निश्चितच आम्हाला आशीर्वाद देतील असेही सांगितले त्याच बरोबर जल सिंचनाचे अनेककामे प्रलंबित आहेत. विकास हा निरंतर चालणारा प्रवाह असुन ते प्रवाह सातत्याने चालत राहील याकरिता माझे प्रयत्न आहेत असेही त्यांनी यावेळी माध्यमाला सांगितले.

तिरोडा/ गोरेगाव विधानसभा क्षेत्रात शरदचंद्र पवार यांच्या तुतारी पक्षाकडून गुड्डू बोपचे तर भाजपा पक्षाकडून विजयभाऊ रहांगडाले यांच्यात निवडणुकीत चांगलीच चुरस होण्याचे चित्र दिसत असुन अनेक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे दाव पणाला लागले आहेत. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचे अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सत्र हेवे दावे चांगलेच रंगतांना दिसत आहे. या निवडणुकीत नेमका बाजी कोण मारेल याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now