चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला कशासाठी?……. कामगारांचा सवाल* ……………………………………… *तालुकास्तरावर बांधकाम कामगारांना किचन किट वाटप करा …….शिवसेनेचे मागणी* …………………………………….. जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल्स
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला कशासाठी?……. कामगारांचा सवाल*
………………………………………
*तालुकास्तरावर बांधकाम कामगारांना किचन किट वाटप करा …….शिवसेनेचे मागणी*. जनता टाइम्स जटा टिव्ही चैनल
……………………………………..
*उमरेड भिवापूर :प्रतिनिधी काजल तांबे
रामटेक लोकसभा अंतर्गत येत असलेल्या उमरेड ,कुही, भिवापूर क्षेत्रातील इंदिरासागर प्रकल्प बाधित आर्थिक दुर्बल असलेल्या बांधकाम क्षेत्रातील कार्यरत असलेल्या कामगारांना राज्य शासनाच्या वतीने निशुल्क किचन साहित्य वाटप योजना गेल्या काही दिवसापासून सुरू करण्यात आली आहे ,परंतु साहित्य किट मिळण्याकरिता रात्रंदिवस नागपूर कापसी तसेच मऊजा ,मौदा येते बांधकाम कामगारांना होणारी पायपीट थांबण्यासाठी किचनकिट वितरण शिबिर भिवापूर तथा उमरेड येथे आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आशिष जी जयस्वाल यांना दिलेल्या निवेदनातून शिवसेना शहर प्रमुख तथा आदिवासी माना आदिम जमात मंडळ मुंबई तालुका भिवापूर चे अध्यक्ष महेश भाऊ डदमल यांनी केली आहे.
निवेदन देताना भिवापूर शहर प्रमुख अभिषेक नाने, उमरेड तालुकाप्रमुख स्वप्निल मेश्राम, उमरेड विधानसभा प्रमुख संजय नाईक प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या वाढदिवसाच्या अवचित साधून या सर्व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना मंगलमय शुभेच्छा दिल्यात.
सदर निवेदनातून भिवापूर शहर तथा उमरेड तालुक्यातील बांधकाम कामगारांना कीट मिळण्यासाठी होत असलेले तारांबळ तथा रखरखत्या उन्हात होणारी पायपीटअसह्य होत असल्याने कमालीचा त्रास सहन करावा लागतो शिवाय अधिकचा आर्थिक भू दंडाला बळी पडावे लागत असल्याचे कामगारांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत असल्याचे नमूद करण्यात आले आहे, तसेच किचन किट मिळण्याकरिता “चाराण्याची कोंबडी नि बारा आण्याचा मसाला “या उप्तीप्रमाणे ऑनलाईन अर्ज मंजूर झालेला लाभार्थी अद्याप आपल्या किचन किट साहित्याच्या लाभापासून वंचित असल्याने भिवापूर उमरेड परिसरात कमालीचा नाराजीचा सूर उमटतआहे.
या बांधकाम कामगारांचा असंतोष दूर करण्यासाठी स्थानिक स्तरावर भिवापूर आणि उमरेड येथे किचन साहित्य शिबिर आयोजित करून होणारा अन्याय दूर करावा व त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
वर्तमान स्थितीत रखरखत्या उन्हात वेळोवेळी नागपूरला जाणे तसेच मजुरीला ठोकर मारून रांगेमध्ये उभे राहणे ही गरीब कामगारांना परवडण्याजोगे बाब नसल्याचे निवेदनातून निर्देशित करण्यात आले आहे. सत्ताधारी शिवसेनेकडूनच निवेदन देण्यात आले असल्याने प्रत्यक्षात कामगारांच्या पदरात आशा की निराशा पडणार? याकडे कामगार नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
