तेंदूपत्ता संकलन करणे बेतत आहे मजुरांच्या जीवावर ! मजूर ठरला वाघाचा बळी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

तेंदूपत्ता संकलन करणे बेतत आहे मजुरांच्या जीवावर ! मजूर ठरला वाघाचा बळ
✍️ सुनिल गेडाम मुख्य पत्रकार ऑल महा ✍️
मुल : तालुक्यात येत असलेल्या मौजा भादुर्णा मधील रहिवासी श्री खुशाल गोविंदा सोनूले वय 50 वर्ष हे तेंदूपत्ता संकलन करण्याकरिता गेले असता दबा धरून असलेल्या वाघाचा बळी ठरला आहे. सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे सध्या गावागावात रोजगार म्हणून तेंदूपत्ता संकलन करण्याचे काम जोरात सुरू आहे. तेंदूपत्ता ल्या आजच्या घडीला चांगला भाव व नगदी रक्कम मिळत असल्याने गावातील बरेच नागरिक तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत असतात. रोजच्या प्रमाणे तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी मौजा भादुर्णा मधील रहिवासी श्री खुशाल गोविंदा सोनूले हे दिनांक १५ / ०५ /२२ ला सकाळच्या सुमारास तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेले. व तेंदूपत्ता गोळा करीत असतांना अचानक अनपेक्षित पणे वाघाने हल्ला करून सदर व्यक्तीस ठार केले. परंतु ही बाब गावातील इतर कोणत्याही नागरिकांना माहीत झाली नाही.रोजच्या वेळेत घरी येणारे आपले पती घरी आले नसल्याने घरी सगळे काळजी करीत होते. ऊन जास्त प्रमाणात असल्याने कुठेतरी थांबले असतील असा समज घरच्या लोकांचा झाला. पण वेळ जस जशी जात होती तस तशी घरच्या लोकांची चिंता वाढत होती. सायंकाळ होऊन सुद्धा घरातील व्यक्ती घरी परत न आल्याची बाब काही गावातील नागरिकांना सांगितली ही बाब गंभीर दिसत असल्याने संबधित नागरिकांनी वनविभाग मूल मधील कर्मचारी याना कळविण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वनाधिकारी गावात येऊन काही नागरिकांना सोबत घेऊन जंगलात शोध मोहीम राबविली पण अंधार पडला असल्याने सर्व जणांना माघारी परत यावे लागले. लगेच दुसऱ्या दिवशी दिनांक १६ / ०५ /२२ ला सकाळी ४ वाजता परत एकदा सदर इसमास शोधण्याकरीता वनकर्मचारी व नागरिक सदर व्यक्तीचा शोध घेण्यासाठी जंगलात गेले. जंगलात काही अंतर पार केल्या नंतर समोर एक ठिकाणी दिसणारा दृश्य मन हेलकावनार होत.
समोर जे चित्र होत ते खूपच भयानक व भीतीदायक होत. संबधित व्यक्तीच्या शरिराचे तुकडे तुकडे करून इतरत्र पसरले होते त्या मध्ये हाथ, पाय , शीर हे अवयव शरीरापासून वेगवेगळे होऊन आजूबाजूला पसरले होते.
सध्या तेंदूपत्ता संकलन करण्याचा रोजगार जरी नागरिकांना मिळत असला तरी, या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी ची जोखीम निर्माण झाली आहे. ताडोबा अभयारण्य परिसरात हा भाग येत असल्याने या ठिकाणी जंगली प्राणी वाघ व बिबट ह्या प्राण्यांचा वावर या परिसरात जास्त प्रमाणात आढळत असतो. सामान्य माणसाच्या जीवनात रोजगार साठी अश्या प्रकारे मरणाच्या दारात जावे लागत आहे. तेंदूपत्ता संकलन मधून रोजगार जरी मिळत असला तरी तरी अशी जीवित हानी च्या घटना सुद्धा घडत आहेत. गावातील नागरिक
परिवाराच्या पालन पोषण करण्यासाठी जीव मुठीत घेऊन तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात जात असतात. सदर व्यक्ती गरीब कुटुंबातील असून ते नेहमी मोलमजुरी चे काम करीत होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
