*🚨स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना..*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

जनता टाइम्स प्रेस
मुंबई प्रतिनिधी: संदीप जाधव
लेख :-अमोल भोजने
*🚨स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना..*
भारतीय प्रशासकीय सेवेत करीअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आधी नागरी सेवांची तोंड ओळख करून घेतली पाहिजे
राज्य लोकसेवा असो किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनमध्ये आत्मविश्वास ,कठोर परिश्रम , व अभ्यासात सातत्य असणे आवश्यक आहे,
📝 प्रथम पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घेतले पाहिजे, तसेच परीक्षा पध्दत समजून घेणे
📝 या परीक्षेसाठी निवडलेल्या विषयाच्या मुळांशी जाऊन अभ्यास केला पाहिजे ,
📝
अभ्यासात दर्जेदार पुस्तके अभ्यासली पाहिजे तसेच कोणत्याही विषयाचा वेगवेगळ्या बाजूने विचार करण्यावर जास्त भर दिला पाहिजे,
📝 दररोज किमान 7 ते 8 तास तन्मयतेने अभ्यास केला पाहिजे ,
📝अभ्यासाचे स्वयंमुल्यमापन करत रहा,मूल्यमापन नुसार काही त्रुटी राहिल्यास त्या दूर करण्याचा प्रयत्न करा..,
📝 स्वतःची वाचन पध्दती विकसित करा , सरावावर जास्त भर द्या ,
📝 मार्गदर्शक व चांगल्या मित्रांचा सल्ला घ्या ,
📝 केंद्रीय लोकसेवा आयोगा बरोबरच इतर स्पर्धा परीक्षा द्यायला हव्यात,
📝 पूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा तसेच नियोजन कौशल्य ,वाचन कौशल्य , चर्चासत्र , गट चर्चा , या वर भर द्या
📝 वर्तमानपत्र वाचणे , इंग्रजी / मराठी , तसेच स्वतःच्या भाषेत स्वतः नोट्स तयार करणे ,
📝 अभ्यासात स्वतःला झोकून द्या, आपल्याकडून होणाऱ्या चुकांचा प्रामाणिक पणे शोध घ्या, त्याची यादी तयार करा, चूका पून्हा होणार नाहीत याची खात्री करा ,
📝 शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत ,
मुलाखती दरम्यान प्रामाणिकपणे ,पारदर्शक ,कणखरपने उत्तरे दिली पाहिजेत ,
कारण मुलाखत ही नागरी सेवा परीक्षेच्या यशामध्ये अत्यंत महत्वाची पायरी आहे, ही बाब लक्षात ठेवून त्यामध्ये स्वतःला अपडेट करत रहा,
योग्य पूर्व नियोजन करून व परीक्षेचे तंत्र अवगत करून , सतत अभ्यास केल्यास ,यश प्राप्त करणे अवघड नाही…!
✍️ अमोल पा. भोजने
( स्पर्धा परीक्षा – UPSC ,MPSC )

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
