नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , *एसीसी सिमेंट कंपनीच्या “नॉट फॉर सेल सिमेंटच्या बैगा कोसारा परिसरात*. *कंपनीच्या अधिकारी व संबंधित कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याची मनसेची मागणी* – जनता टाइम्स न्यूज

*एसीसी सिमेंट कंपनीच्या “नॉट फॉर सेल सिमेंटच्या बैगा कोसारा परिसरात*. *कंपनीच्या अधिकारी व संबंधित कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याची मनसेची मागणी*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

*एसीसी सिमेंट कंपनीच्या “नॉट फॉर सेल सिमेंटच्या बैगा कोसारा परिसरात*.

*कंपनीच्या अधिकारी व संबंधित कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याची मनसेची मागणी*.

राजेंद्र मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

*चंद्रपूर* गेल्या साडेतीन वर्षांपूर्वी घुग्गुस नकोडा येथील एसीसी सिमेंट कंपनीच्या नॉट फॉर सेल सिमेंट च्या बैगा खाजगी घर बांधकामाकरिता वापरत असल्याची माहिती समोर आल्यानंतर दिनांक 5/12/2018 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाने एसीसी सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना घुग्गुस पोलीस स्टेशन मधे बोलावून जप्त केलेल्या सिमेंट बैगा ह्या तुम्हच्याच आहे का? व असल्यास तशी तुम्ही तक्रार द्या असे सांगितल्यावर एसीसी सिमेंट कंपनीचे सिविल विभागाचे प्रमुख विवेक शर्मा यांनी तक्रार दिली व जवळपास तीन कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

मागील साडेतीन वर्षांपूर्वी घदलेल्या त्या घटनेची पुनरावृत्ती परत होत असून रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोसारा या गावाशेजारी असलेल्या एका खाजगी प्लॉट वर अंदाजे जवळपास 20 ते 22 नॉट फॉर सेल च्या सिमेंट बैगा बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पडून आहे. या संदर्भात मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी दिनांक 19/5/2022 ला रामनगर पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांच्याशी पर्यावरण नेते राजेश बेले व इतर मनसे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन चर्चा केली व त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी रामनगर पोलीस स्टेशन मधे तक्रार सुद्धा केली. परंतु पोलीस प्रशासन म्हणताहेत की हे प्रकरण पोलिसांकडे येत नाही तर तहसीलदार यांच्याकडे येते पण तहसीलदार स्वतः याबाबात अनभिज्ञ असून सरकारी वापरासाठी दिल्या जाणाऱ्या सिमेंट चा वापर जर चुकिच्या पद्धतीने होत असेल व कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने जर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असेल तर मग यावर प्रतिबंधक लागणार कधी? हा चिंतेचा व चिंतनांचा विषय आहे आणि म्हणूनच या नॉट फॉर सिमेंट कंपनीच्या बैगा ज्या बेकायदेशीर पणे खाजगी कामासाठी वापरल्या जातं आहे त्याची चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व कंत्राटदारावर गुन्हे दाखल करावे अशी मागावी मनसे तर्फे पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सुद्धा देण्यात आले.

साडेतीन वर्षांपूर्वी जवळपास 200 नॉट फॉर सेल सिमेंट च्या बैगा घुग्गुस पोलिसांनी जप्त केल्या होत्या त्यावेळी त्या 200/- प्रती दराने कलीम नावाच्या एका खाजगी बांधकाम करणाऱ्या व्यक्तीने कंपनीचे कंत्राटदार यांच्याकडून विकत घेतल्या होत्या आणि आता 20-25 बैगा आढळल्या आहेत त्या इतरत्र सुद्धा विकल्या गेलेल्या असू शकते त्यामुळे सरकारी कामासाठी वापरण्यात येत असलेल्या सिमेंट बैगा ह्याची चोरी होत आहे हे शिद्ध होत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक साळवे यांनी याबाबत तात्काळ निर्णय घेऊन व रामनगर पोलिसांना आदेश देऊन तो नॉट फॉर सेल सिमेंट बैगाचा माल जप्त करावा व यामध्ये नेमके कंपनीचे कोण अधिकारी सामील आहे किंव्हा कोणते कंत्राटदार यामध्ये सामील आहेत त्याचा तपास लावून त्यांच्यावर सिमेंट चोरीचे गुन्हे दाखल करावे ब सरकारी संपती ची चोरी थांबवावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना याप्रकरणी आंदोलन करेल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी दिला आहे. यावेळी मनसे जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष सुनील गुडे,शहर अध्यक्ष विजय तुरक्याल, मनविसे शहर उपाध्यक्ष पीयूष धूपे. मनसे शहर उपाध्यक्ष अतुल दिघाडे. प्रफुल गेडाम इत्यादींची उपस्थिती होती.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed