प्रहारच्या प्रयत्नाने यावर्षीसुद्धा घरकुल लाभार्थ्यांना पुन्हा मिळणार मोफत रेती तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा घाटाचा समावेश

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

प्रहारच्या प्रयत्नाने यावर्षीसुद्धा घरकुल लाभार्थ्यांना पुन्हा मिळणार मोफत रेती तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा घाटाचा समावेश
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
गोंदिया :- प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मागीलवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामा करीता मोफत रेती मिळावी म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गोंदिया जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर जिल्हा सचिव महेंद्र नंदागवळी यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांना १३/०१/२०२२ ला निवेदन देण्यात आले होते.
त्या पत्राच्या अनुषंगाने वेळोवेळी अप्पर जिल्हाधिकारी, खनिनकर्म अधिकारी, गोंदिया तहसिलदार तिरोडा यांना वेळोवेळी पपाठपुरवठा केला व भेटी दिल्या त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या कार्यालयाचे पत्र क्रमांक. अका/खनिज/कावि-348/ 2022 दिनांक 20/05/2022 चा आदेश संबंधित सर्व तहसिलदारांना देण्यात आला असून येत्या 2 दिवसात तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदी काठी असलेला रेतीघाट घरकुल लाभार्थ्याकरीता मोफत शुन्य रायल्टीवर सुरू होणार असल्याचे तिरोडाचे तहसिलदार प्रशांत घोरुडे यांनी प्रहारचे गोंदिया जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, जिल्हा सचिव महेंद्र नंदागवळी, तिरोडा तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने, वामन हजारे प्रहार शिष्ट मंडळाला कळविले आहे.
घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती मिळन्याची वार्ता मिळताच रेती कधी उपलब्ध होणार याची व्याकुळता असुन घरकुल लाभार्थ्यांना वाढत्या महागाईतुन थोडा दिलासा मिळाल्याचे लाभार्थ्यात व जनसमान्यांच्या मुखातून चर्चासत्राद्वारे सर्वत्र दिसून येत आहे.
✍️जनता टाइम्स✍️
🎤जटा TV🎤
इंसाफ चाहता है इंडिया ….…..

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
