रामटेक नगरपरीषद निवडणुकीचे आरक्षण निकाल…
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
रामटेक नगरपरीषद निवडणुकीचे आरक्षण निकाल
✍️ जनता टाइम्स ✍️
🎤 जटा TV 🎤
✍️ सचिन चौरसिया ✍️
रामटेक शहर प्रतिनीधी
प्रतिनीधी:- नगरपरिषद रामटेक च्या २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुकीमध्ये महिलांसाठी दि. १३ मार्च ला नगर परीषद रामटेकमध्ये आरक्षण काढण्यात आले.शहरात १० प्रभाग तयार करण्यात आले असुन प्रत्येक प्रभागात २ उमेदवार राहाणार आहेत.
शहराची एकुण लोकसंख्या २२३१० असुन यामध्ये अनुसुचीत जातीच्या ३०४० व अनुसुचीत जमातीच्या १३८७ लोकसंख्या आहे. शहरात पुर्वी १७ न.प. सदस्य होते, आता त्यांची संख्या वाढुन २० झालेली आहे.
प्रभाग क्र. १अ, ७अ, ९अ मध्ये अनुसुचीत जाती व प्रभाग ८अ मध्ये अनुसुचीत जमाती सर्वसाधारण आरक्षीत करण्यात आले आहे. राहिलेले प्रभाग २अ, ३अ, ४अ, ५अ, ६अ, तथा १०अ मध्ये सर्वसाधारण ( ओपन ) महिलांसाठी आरक्षीत आहे. प्रभाग क्र. १ ते १० ब सर्वसाधारण ( ओपन ) आहे.
नगरपरिषद रामटेक मध्ये उपविभागिय अधिकारी वंदना सवरंगपते यांचे मार्गदर्शनात आरक्षण काढण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अर्चना मेंढे, व शहरातील विविध पार्टीचे कार्यकर्ता उपस्थित होते. आरक्षण सोडत जाहीर होताच विविध पार्टी चे कार्यकर्ता निवडणुकीसाठी सक्रिय झाले.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space