*पंचायत समिती रिसोड बांधकाम विभागातील हलगर्जीपणा
आत्मराम जाधव / जिल्हा प्रतिनिधी वाशीम
रिसोड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व गावामध्ये प्रधान मंत्री आवास योजना 2022-23 या वार्षिक योजनेची सुरवात 1 जून रोजी चालू झाली गावातील नागरिकांनी त्यांच्या फाईल दाखल केल्या आहेत तसेच त्या बांधकाम विभाग ग्रामसेवक यांच्य हस्ते संबंधित डेक्स वर तसेच विस्तार अधिकारी यांच्या कडे सुपूर्त केल्या आहेत परंतु पंचायत समिती कडून कोणत्याच प्रकारची दखल घेतलेली नाही आणि कोणत्याच नागरिकांची घरकुल नोंदणी पूर्ण झालेली नाही .
गावातील नागरिकांचे असे म्हणणे येत आहे की वसुली ची आस धरून नोंदणी लांबणीवर पडली आहे असे गावकरी मंडळी त्यांचे विचार मांडत आहे ह्याच अनुषंगाने पंचायत समिती रिसोड येथील कार्यालयास भेट देऊन विचारणा केली असता ते फाईल सापडत नाही सापडल्यास आम्ही करू अशी उत्तरं तेथील कर्मचारी वर्ग गावकऱ्यांना देत आहेत ….. पुढील काही दिवसात ग्राम पंचायत ची निवडणूक चालू होईल आणि त्या नंतर आचारसंहिता लागू होण्याची भीती नागरिकांना सतावत आहे आणि जर आचारसंहिता लागणयापूर्वी जरी यादी तयार करून त्यावर अमल बजावणी केली तरी सुधा घरकुल योजनेचे टार्गेट पूर्ण होणार नाही याची खात्री गावकरी नागरिकांना आहे.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें
|
Advertising Space