तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी मुन यांच्या टीमचा सागवान तस्करावर रात्री जागता पहारा, तस्कर व तस्करी करीता वापरलेली मोटारसायकल केली जप्त

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी मुन यांच्या टीमचा सागवान तस्करावर रात्री जागता पहारा, तस्कर व तस्करी करीता वापरलेली मोटारसायकल केली जप्त
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
तिरोडा :- तिरोडा वन परिक्षेत्रात सहवनक्षेत्र गोविंदटोला नियतक्षेत्र मंगेझरी कक्ष क्रमांक 108 राखीव वनात तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी मुन यांच्या टीमला 2 (दोन) अवैध कत्तल केलेल्या झाडांचे थुट दिसून आले मात्र त्या ठिकाणी कापलेले लाकूड दिसून आले नाही सदर जंगलातील क्षेत्रात दिनांक 18/09/2022 ला रात्री 2 ते 2:30 च्या दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी मुन व यांची टीम गस्तीवर असतांना काही इसम साग प्रजातीच्या लाकुडाच्या झाडांचे तुकडे मोटार सायकलवर नेत असतांना दिसले.
गस्तीवरील वन कर्मचारी यांनी अटकाव करून विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा अंगावरती वाहन चालवण्याचा प्रयत्न केला व मोटरसायकल वरील वनमालासह मौक्या वरून पळ काढला गस्तीवर वन कर्मचारी यांना इसमाची ओळख पटली व वनगुन्ह्याची चौकशी करण्याकरिता दिनांक 19/09/2022 ला संशयित इसम महेंद्र शिवाजी किरसान रा. गोविंदटोला यांना घर झडती वॉरंट जारी करून त्यांच्या घराची झडती पंचासमोर करण्यात आली.
घर झडतीत मौक्यावर 40 नग घ.मी. 0.292 किंमत 26971 रुपये किंमत वनउपोज मिळाला सदर मालाचे मौकास्थळी मोजमाप, पंचनामा केला व मिळालेले साहित्य जप्त करून पुढील चौकशीसाठी महेंद्र किरसान यांना ताब्यात घेण्यात आले असून वनगुन्ह्यास वापरण्यात आलेली मोटार सायकलही जप्त करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीने वनगुन्ह्यास मदत करणारे सहकारी आरोपी 1) सुरेंद्र भिवाजी किरसान रा. गोविंदटोला, 2) दीपक मुन्ना किरसान रा. गोविंदटोला यांचे नाव सांगितले असून सादर आरोपी फरार असल्याची माहिती प्रसिद्दी पत्रकाद्वारे देण्यात आली.
सदरची कार्यवाही श्री. कुलराज सिंग, उपवनसंरक्षक गोंदिया, श्री. आर. सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व कॅम्पा) गोंदिया, यांच्या मार्गदर्शनात तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. आर. जी. मुन, हे करत असून सदरच्या कार्यवाहीत क्षेत्र सहाय्यक बी. ए. कोहरे, एस. जी. पारधी, एम. एम. कडवे, ए. एफ. बेग, व वनरक्षक श्री. एम. एम. बिसेन, आर. डी. तुरकर, एन. सी. सेलगावे, ए. एम. नाईक, एम. जी. नागपुरे, आर. डब्लू. ढोरे, ओ. ए. मेश्राम, डी. एन. टेंभरे, एम. जे. सूर्यवंशी, कु. एम. बी. नागरगोजे, एन. एस. येळे, पी. पी. पंचार, एस. जे. सूर्यवंशी, एन. ए. शेख, हे सहभागी होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
