रामटेक एस. टी. डिपोवर शेकडो शालेय विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

रामटेक एस. टी. डिपोवर शेकडो शालेय विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा
सचिन चौरसिया
रामटेक शहर प्रतिनीधी
रामटेक :- दिनांक २०/०९/२०२२ रोजी उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांच्या नेतृत्वात शेकडो विद्यार्थ्यांचा रामटेक एस. टी. डिपोवर धडक मोर्चा मागील अनेक दिवसांपासून रामटेक ते तुमसर मार्गावर अनिश्चित वेळेवर चालत असलेल्या बसेस मुळे विद्यार्थ्याची गैरसोय होत, असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
विद्यार्थी रात्री ०८:०० वाजता पर्यंत घरी पोहोचत असतात, घरी उशिरा पोहोचत असल्यामुळे पालकांना त्यांची खुप काळजी होते. एका मुलीनी सांगितल्या नुसार सायंकाळी ०६:३० वाजले असल्यानंतर ही बस लागली नाही म्हणुन तिने कार्यरत असलेल्या निवेदकाला विचारले असता ते महाशय त्या मुलीवर चिडले व रागाने बोलले की इथुन दुर व्हा म्हणुन विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला.
त्यांनी माजी उपसभापती गज्जु भैय्या यादव यांच्याकडे तक्रार केली. गज्जुभैय्या च्या आगार व्यवस्थापकांकडे शेकडो विद्यार्थ्यांनी मोर्चा घेऊन गेले व रितसर अर्ज केला व आपली समस्या मांडली.
आगार व्यवस्थापकांनी बसेस कमी असल्याची आपली समस्या सांगितली, त्यावर गज्जु यादव यांनी संबंधित भंडारा व नागपुर जिल्हा वाहतूक नियंत्रक अधिकऱ्यांना फोन लावुन विद्यार्थ्यांच्या अडचणी सांगितल्या व रामटेक डिपो साठी दोन अतिरिक्त बसेस मंजुर करण्याची मागणी केली.
उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांनी शिवनी-भोंडकी, भंडारबोडी, हंसापुर, आसोली येथील मुलांना जाण्यांकरिता आज ०५:३० वाजता पासुनच त्वरित बसची बस उपलब्ध करून शेकडो विद्यार्थ्यांची समस्या त्वरित सोडविली.
याप्रसंगी श्रीराम विद्यालय रामटेक, राष्ट्रीय आदर्श विद्यालय, व समर्थ विद्यालय रामटेक चे शेकडो विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. सोबतच शिक्षक श्री अनिल कोल्हे, बबलु यादव, दिनेश टांगले, पवन मोहारे उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
