मुंडीकोटा कृषी मंडळ कार्यालय वाऱ्यावर तालुका कृषी अधिकारी यांचा बेजबाबदार कर्मचाऱ्याला अभय जिल्हा कृषी अधिक्षक यांचे दुर्लक्ष.
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
मुंडीकोटा कृषी मंडळ कार्यालय वाऱ्यावर तालुका कृषी अधिकारी यांचा बेजबाबदार कर्मचाऱ्याला अभय जिल्हा कृषी अधिक्षक यांचे दुर्लक्ष.
कृषी विभागाचे प्रशासन कुंभकर्णाच्या निद्रावस्थेत
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार, ( ऑल इंडिया.)
तिरोडा :- तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील महाराष्ट्र शासनाचे कृषी मंडळ कार्यालय वाऱ्यावर असून रोज कार्यालयात एक ना एक शेतकरी कार्यालयाच्या वेळेवर कामानिमित्त येतात मात्र कर्मचारी महोदय 11 ते 12 पर्यंत येत नसून कार्यालयाला बंद कुलूप पाहून त्यांना माघारी परत जावे लागते.
दिनांक 28/09/2022 ला 11 वाजले तरी कार्यालयाला कुलूप लागले होते, अनेक दिवसांपासून हा प्रकार मुंडीकोटा येथील कृषी मंडळ कार्यालयात सुरू आहे त्याबाबत अनेकदा वृत्त प्रकाशित करण्यात आले मात्र अश्या बेजबाबदार कर्मचाऱ्यावरती कार्यवाही न करता तालुका कृषी अधिकारी हे अभय देत असल्याचे दिसत आहे, अनेकदा बातम्या प्रकाशित करून हा प्रकार प्रशासनाच्या ध्यानात आणून दिले आहे.
मुंडीकोटा येथील कृषी मंडळ कार्यालय बंद असल्यामुळे तालुका कृषी अधिकारी तिरोडा यांना, त्यांची प्रतिक्रिया घेतली असता याबाबत त्यांच्याकडून कसलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
जिल्हा कृषी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असून बेजबाबदार कर्मचारी अधिकारी यांच्यावरती अनेकदा वृत्त प्रकाशित केल्यानंतरही कार्यवाही करत नसल्याने जैसे थे सुरू आहे, महाराष्ट्र शासनाचे शेतकऱ्यांसाठी असलेले कृषी विभागाचे कार्यालय कुचकामी ठरत आहे. शासनाने या प्रकारावरती दखल घेऊन अश्या बेजबाबदारपणा वरती आळा घालावा अशी मागणी परिसरात जोर धरू लागली आहे.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space