कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या गांगला साझा क्र. 22 येथील तलाठी यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी आमदार, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे सरपंचाची तक्रार

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या गांगला साझा क्र. 22 येथील तलाठी यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी आमदार, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे सरपंचाची तक्रार
राकेश बोरकर
प्रतिनिधी तिरोडा
तिरोडा :- तिरोडा तालुक्यामधील गांगला येथील साझा क्रमांक 22 येथील तलाठी कार्यालयात तलाठी तईकर हे वेळेवर हजर राहत नसल्याने शेतकऱ्यांना लागणारे दाखले 7/12, नमुना-8 , इतर कागदपत्रे वेळेवर मिळत नाही त्यांच्याकडून दाखला घेण्याकरिता येणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना उध्दड वागणूक, अरेरावीची भाषा वापरण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना अपमानजनक वागणूक व त्रास सहन करावा लागत आहे.
साझा क्र. 22 गांगला मधील संबंधित तलाठी तईकर यांच्यवरती कार्यवाही करण्यासाठी वारंवार तक्रार करण्यात आली मात्र कसलीही कार्यवाही न झाल्याने ग्रामपंचायत खोपडा/ इसापूर, चे सरपंच निशा संतोष बावनकर, व ग्राम पंचायत बयवाडा, ग्राम पंचायत नवरगाव येथील सरपंच, शेतकरी सामाजिक कार्यकर्ता संतोष बावनकर यांनी तिरोडा/गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रहांगडाले, जिल्हाधिकारी गोंदिया, तहसिलदार तिरोडा, एस.डी.ओ तिरोडा यांच्या कडे कार्यवाही करण्याकरिता तक्रार सादर केलेली आहे.
तलाठी तईकर यांचावरती कार्यवाही व इतर ठिकाणी बदली न केल्यास तिरोडा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याची ताकीद दिलेल्या निवेदनातून ग्रामपंचायत खोपडा/ इसापूर, नवरगाव, बयवाडा च्या सरपंचांनी दिली आहे. प्रशासन, शासन यावर कोणती कार्यवाही करते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
