पाहंदिपारी कृपाल लिंगो गोंडीयन आद्य गुरु यांची जयंती
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पाहंदिपारी कृपाल लिंगो गोंडीयन आद्य गुरु यांची जयंती
राकेश बोरकर
प्रतिनिधी तिरोडा
भंडारा: जिल्ह्यातील तुमसर सुभाषचंद्र बोष शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे पाहंदिपारी कृपाल लिंगो गोंडीयन आद्य गुरु यांची जयंती निमित्त आज दिनांक 9 ऑक्टोबर रविवारला फडापेन पेनठाणा लिंगोगड गायमुखचे अध्यक्ष मरस्कोल्हे , बालेश वरकडे आणि मित्र परिवार यांचे सहकार्याने पार पडणार आहे.
गोंडीयन आदिगुरु “पाहंदी पारी कृपार लिंगो” यांची जयंती भारतातील गोंड समाज हा” कोयागिरी पौर्णिमा ” मनुन साजरा करत असतो. पाहंदी पारी कृपार लिंगो यांनी गोंडी धर्माची स्थापना करून गोंड समाजातील लोकांना जीवनाचा मार्ग दाखविला.
कृपार लिंगो यांनी निसर्ग शक्तीला सर्वोच्च देवता मानले व निसर्गाला फडापेन असे नाव दिले. पाहंदी पारी कृपार लिंगो यांनी गोंड समाजातील व इतर समाजातील लोकांना जगण्यासाठी गोत्र वंशावळी सम-विषमच्या आधारावर स्थापन केली.
समाजातील लोकांना शिक्षण देण्याकरिता ‘गोटूल’ या शैक्षणीक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थेची स्थापना केली. या महान आदिगुरु पाहंदी पारी कृपार लिंगो यांची आज जयंती, त्यानिमित्ताने ‘ फडापेन पेनठाना लिंगोगड (गायमुख)चे अध्यक्ष विकास भाऊ मरस्कोल्हे व बालेश वरकडे, मित्र परिवार यांच्याकडून सुभाषचन्द्र बोस शासकीय रुग्णालय तुमसर येथे रुग्णांना फळवाटपाचे कार्यक्रम आयोजित केले आहे.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space