आद्य गुरू कृपाल लिंगो जयंती निमित्त रुग्णांना फळांचे वाटप
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|


आद्य गुरू कृपाल लिंगो जयंती निमित्त रुग्णांना फळांचे वाटप

राकेश बोरकर
प्रतिनिधी तिरोडा
भंडारा : आज दिनांक 9 ऑक्टोबरला सुभाषचंद्र बोष शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुमसर आणि आदिवासी मुलींचे शासकीय निवासस्थान येथे बालेश वरकडे, अतित डोंगरे यांचे नेतृत्वात गोंडवाना संघर्ष कृती समिती आणि आदिवाशी एमप्लॉई फेडरेशन तुमसर यांचे संयुक्त विद्यमाने आदिवासी आद्य गूरू कृपाल लिंगो यांचे जयंती निमित्त फळांचे वाटप करण्यात आले.
गोंडीयन आद्यगुरू पहांदी पारी कृपाल लिंगो यांची जयंती भारतातील गोंड समाज हा कोयागिरी पौर्णिमा साजरी करीत असतात. कोया पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात.
डॉ.अनिता कारेमोरे सु. बो. शासकीय रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमुख उपस्थित साजरा करण्यात आला.
यावेळी मंगेश पेंदाम, मंगेश गेडाम, बि.पी.घाटे, प्रभाताई पेंदाम, सोनू उईके, महेश मलेवार, शालिक भलावी, राकेश राऊत, आर.आर. परतेती राउंड आफिसर, डी. के. कुंभरे एस.टी. महामंडळ तुमसर शालिकराम भलावी ग्रामसेवक उपस्थित होते.


|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





