पीण्याचा पाण्यासाठी महिला शहर काँग्रेस चा रामटेक नगर परिषद वर मोर्चा…
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पीण्याचा पाण्यासाठी महिला शहर काँग्रेस चा रामटेक नगर परिषद वर मोर्चा…
✒️ जनता टाइम्स ✒️
🎤 जटा TV 🎤
✒️सचिन चौरसिया ✒️
रामटेक शहर प्रतिनीधी
प्रतीनीधी :- शिवाजी वार्ड येथील महिला शहर काँग्रेस कमिटीच्या धडाडीच्या कार्यकर्त्या सौ.शारदाताई बर्वे यांनी रामटेक शहर काँग्रेस चे नेते पी.टी.रघुवंशी तथा रामटेक शहर काँग्रेस चे कार्यकारी अध्यक्ष नितीनजी भैसारे यांना फोन करून बोलाविले सर्व कार्यकर्त्यांसह पी.टी. रघुवंशी आणि नितीन भैसारे नगर परिषद कार्यालयात पोहोचले. तेथे उपस्थित महिलांनी शिवाजी वार्ड मधील पाण्याच्या समस्ये बाबत अवगत केले.
त्यानंतर रामटेक शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वात श्री.मंगेशजी वासेकर, मुख्याधिकारी नगर परिषद रामटेक यांना निवेदन दिले मुख्याधिकारी साहेब यांच्या तर्फे श्री. राकेशजी सव्वालाखे यांनी निवेदन स्वीकार केले व मुख्याधिकारी साहेब यांच्याशी भ्रमणध्वनी वर संपर्क करून समस्येबाबत अवगत करण्यात आले.
लवकरात लवकर पाण्याची समस्या सोडविण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी साहेब यांनी दिले.
याप्रसंगी पी.टी.रघुवंशी नेते रामटेक शहर काँग्रेस,नितीनजी भैसारे कार्याध्यक्ष रामटेक शहर काँग्रेस कमिटी, यादव जांभुळकर माजी नगर सेवक, आरिफ मालाधारी उपाध्यक्ष रामटेक शहर काँग्रेस कमिटी, सौ.शोभाताई राऊत माजी नगराध्यक्षा न.प.रामटेक, सौ.पुष्पाताई बर्वे माजी नगरसेविका रामटेक, विनायक तुरक, नासिर शेख, चंद्रभान शिवरकर, श्याम बिसन, रामदास नागपुरे,दुर्जन बर्वे, सौ.रंजनाताई मस्के उपाध्यक्ष रामटेक महिला काँग्रेस कमिटी, सौ.शारदाताई बर्वे महासचिव रामटेक शहर महिला काँग्रेस कमिटी, सौ.विमलाताई नागपुरे, सौ.कुसुमा अहिरकर, सौ.शारदा प्रजापती, सौ.अश्विनी बावनकुळे, सौ.सोनी बावनकुळे, सौ.वैशाली वाघमारे, सौ.सुशीला पंचेसर, सौ.कमलाबाई माहूरकर, कलाबाई चंदनबटवे, सौ.ओजस्वी बर्वे, सौ.प्रमिलाबाई अहिरकर उपस्थित होते.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space