नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , मोहफुलाची हातभट्टी दारु तयार करणाऱ्या ठिकाणावर वरिष्ठांच्या आदेशाने छापा मारुन २१,५००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त. गंगाझरी पोलिसांची कारवाई. – जनता टाइम्स न्यूज

मोहफुलाची हातभट्टी दारु तयार करणाऱ्या ठिकाणावर वरिष्ठांच्या आदेशाने छापा मारुन २१,५००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त. गंगाझरी पोलिसांची कारवाई.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

मोहफुलाची हातभट्टी दारु तयार करणाऱ्या ठिकाणावर वरिष्ठांच्या आदेशाने छापा मारुन २१,५००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त. गंगाझरी पोलिसांची  कारवाई.

वरिष्ठांचे आदेश नसताना दारू काढणे, व विक्री, सत्र सुरू ठेवण्यासाठी, कानाडोळा करण्यासाठी महीना बांधुन दारू सुरू ठेवणाऱ्या परिसरातील त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाही होणार का ?

महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)

गोदिया :-  गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोहफुलची दारू काढणाऱ्याचे, विकणाऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू आहे, गंगाझरी पोलीस स्टेशन ने वरिष्ठांच्या आदेशाने दारू पकडली. मात्र आदेश नसतांना दारू काढणे, व विक्री, सत्र सुरू ठेवण्याकरीता, कानाडोळा करण्यासाठी महीना बांधुन दारू सुरू ठेवणाऱ्या परिसरातील त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाही व्हावी अशी चर्चा परिसरातील नागरिकात आहे. पोलीस प्रशासनाने अशा अधिकाऱ्यांचा शोध घेऊन दारू काढणे, व विक्री सुरू करण्यासाठी त्या अधिकाऱ्याला जबाबदार धरून कारवाही करावी अशी मागणी परिसरात जोर धरू लागली आहे.

नव्याने रुजू झालेले पोलीस अधिक्षक पिंगळे अश्या कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कोणती कारवाही करतात याकडे सर्व सामान्य नागरिकांचे लक्ष वेधून आहे.

जिल्हयात अवैधरित्या मोहफुलाची हातभट्टी दारुची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश मा. पोलीस अधिक्षक गोदिया श्री. निखील पिंगळे सा. यांनी दिले. त्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक गोदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर  आणि श्री. प्रमोद मडामे , SDPO तिरोडा यांनी दिल्यावरुन व वरीष्ठांचे आदेशान्वये पो.स्टे गंगाझरी हददी मधील मौजा धामनेवाडा जंगल झुडपी परिसर ता. गोंदिया येथे ठाणेदार पोलीस स्टेशन गंगाझरी यांचे नेतृत्वात व मागदर्शनाखाली मौजा धामनेवाडा  जंगल परिसरात दि. २०/११/२०२२ रोजी दोन जर्मन करच्या, सडवा रसायन मोहफुल, हातभट्टी दारु व इतर साहीत्य असा एकुण मुद्येमाल किमती २१,५००/- रु चा माल मिळुन आले असून आरोपी नामे भोजराज उर्फ शिकारी प्रेमलाल मसराम वय ६२ वर्ष, रा धामनेवाडा ता. गोंदिया  ता. जि. गोंदिया – यांचेवर पोलीस स्टेशन गंगाझरी येथे अप. क्र.  ३५०/ २०२२ कलम ६५  (ब)(क)(ड)(ई)(फ) महाराष्ट्र दारु बंदी कायदा अंतर्गत  गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कामगिरी वरीष्ठांचे निर्देश व आदेशान्वये ठाणेदार पोलीस निरीक्षक महादेव तोदले, पो.हवा. रामेश्वर बर्वे ब.न. ९६० , पो.शि. अशोक मौजे ब.नं.१९८३ पो. शि. जितेन्द्रसिग बघेल बं.नं.१८२५ यांनी सदर ची कार्यवाही केली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now