नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , बच्चू कडूच्या प्रहारची तिरोडा तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकीत दमदार एन्ट्री – जनता टाइम्स न्यूज

बच्चू कडूच्या प्रहारची तिरोडा तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकीत दमदार एन्ट्री

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

बच्चू कडूच्या प्रहारची तिरोडा तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकीत दमदार एन्ट्री

राकेश बोरकर
प्रतिनिधी तिरोडा

तिरोडा :- तिरोडा तालुक्यात जिल्हापरिषद निवडणुकीच्या रिंगणात प्रहार प्रथमच कवलेवाडा जिल्हापरिषद क्षेत्रात उतरले होते, त्यात दुसऱ्या क्रमांकावर प्रहार पक्ष होते तर मुंडीकोटा पंचायत समिती सदस्य सौ. वनिता भांडारकर यांनी रेकोर्ड तोड मते मिळवून निवडून आल्या, तर वडेगाव जिल्हापरिषद क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

मात्र आता झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत सुद्धा प्रहारचे उमेदवार लढविण्यात आले त्यात ग्राम पंचायत बयवाडा येथे महेंद्र भुरे हे बिनविरोध उपसरपंच म्हणून निवडून आले , तर ग्राम पंचायत मुरमाडी येथे राजू पदम मेहर, हे सुद्धा उपसरपंच म्हणून निवडून आले, त्यात ग्रा. पं. सदस्य म्हणून श्री. जवाहरलाल भोजराम पटले, सौ. विद्या सुरेश ठवकर, श्री. मूलचंद बुधाजी पंधरे, सौ. चित्रकला गणेश हटेवार हे निवडुन आले तर, घाटकूरोडा येथे उपसरपंच म्हणून मनिष भांडारकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. व इतरही ग्राम पंचायत मध्ये प्रहारचे सदस्य निवडून आल्याने नव्याने तिरोडा तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या ग्राम पंचायत निवडणुकीतील जोरदार एन्ट्रीची सर्वत्र तालुक्यात चर्चा सुरू आहे. बच्चू भाऊ कडूच्या विचारधारेला मानणारे तिरोडा तालुक्यात असंख्य जनसमुदाय असून या नंतर प्रहार पक्ष प्रत्येक निवडणुकीच्या रिंगणात उतरून निवडून येईल अशी प्रतिक्रिया प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, व तिरोडा तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने यांनी दिली आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed