राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्याचे निवेदन
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्याचे निवेदन
राकेश बोरकर
प्रतिनिधी तिरोडा
तिरोडा :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून दिनांक 16/1/2023 ला तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनात प्रामुख्याने
१) इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणात 100% शिष्यवृत्ती लागु करने.
२) शासकिय नोकरी मध्ये परिक्षा देणाऱ्या इतर मागासवर्गीय उमेदवाराला बस व रेल्वे मोफत सोय उपलब्ध करुन देणे.
३) इतर मागासवर्गीय शेतमजुरांना शेती वाटप, करने इत्यादी
विविध मागण्यांचे उल्लेख या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आले.
निवेदन देतांना राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे प्रदेश उपाध्यक्ष श्री. वाय. टी कटरे, श्री. किशोरजी मलेवार कार्यकारिनी सदस्य, श्री. राजेन्द्र फाये, श्री. रामकृष्ण गाढवे, श्री. वसंत बौपचे, श्री. विठ्ठल मेश्राम, श्री. शिवशंकर साठवणे, सौ. कल्पना मलेवार, श्री. गरिबचंदजी मलेवार, श्री. विष्णु मलेवार, श्री. रोहिदास बावनकर, श्री. गणेश मलेवार, श्री. प्रमोद बावनकर, श्री. ज्ञानेश्वर बावनकर व सर्व ओबीसी पदाधिकारी सदस्य गण उपस्थित होते.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space