शाळेच्या स्वयंपाकी व मदतनीस यांच्या मानधनात 2500 नी वाढ, प्रहारच्या पाठपुराव्याला व महिलांच्या आंदोलनाला यश प्राप्ती
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
शाळेच्या स्वयंपाकी व मदतनीस यांच्या मानधनात 2500 नी वाढ, प्रहारच्या पाठपुराव्याला व महिलांच्या आंदोलनाला यश प्राप्ती
राकेश बोरकर
तालुका प्रतिनिधी तिरोडा
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील जिल्हापरिषद शाळेत स्वयंपाक करणाऱ्या महिलांना अत्यल्प मानधनात काम कराव लागत असे ही बाब प्रहार ने उचलून त्याचा पाठपुरावा माजी. राज्य मंत्री तथा आमदार बच्चू कडू यांच्या मार्फत शासनाच्या निदर्शनास आणून दिली त्याच बरोबर गोंदिया जिल्ह्यातील स्वयंपाकी, मदतनीस महिलांनी जिल्हा परिषद गोंदिया समोर 3 दिवस केलेल्या आंदोलनास प्रहार जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, तिरोडा तालुकाध्यक्ष प्रदीप निशाने यांनी महिलांच्या मानधन वाढ संदर्भात होत असलेल्या आंदोलन स्थळी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्याचा बरोबर प्रहारचे संस्थापक/ अध्यक्ष माजी. राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या मार्फत शासन स्तरावर पत्र व्यवहार केला महिलांनी सुद्धा नागपुर येथे हिवाळी अधिवेशनात आंदोलन करुन ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली त्यांच्या व प्रहारच्या प्रयत्नांना शेवटी न्याय देत प्रधानमंत्री पोषण निर्माण योजने अंतर्गत काम करत असणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांच्या यांच्या मानधनात शासनाने 2500 रुपयाने वाढ केली असून ते वाढीव मानधन सन 2023 – 24 आर्थिक वर्षापासून लागू होऊन एप्रिल – 2023 पासून सुरु होऊन दहा महिन्यासाठी लागू राहील. असे शासन निर्णय 9 फेब्रुवारी 2023 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांनी काढले आहे.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space