छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सरांडी ग्राम वासियांनी केली गावाच्या स्वच्छतेला सुरुवात.
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सरांडी ग्राम वासियांनी केली गावाच्या स्वच्छतेला सुरुवात.
राकेश बोरकर
तालुका प्रतिनिधी तिरोडा
तिरोडा :- ग्राम सरांडी येथे छत्रपती शिवराय यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज पासून गाव स्वच्छतेचा संकल्प केला आज दिनांक 19/02/2023 ला सकाळच्या सुमारास गावातील तरुण मंडळी, सामाजिक कार्यकर्ता आणि ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी गावातील प्रवेश द्वारापासून गावातील स्वच्छतेला सुरुवात केली. हा स्वच्छतेचा उपक्रम दर रविवारी आठवड्यातून एक दिवस सुरु राहील असे गावचे उपसरपंच राजू दमाहे यांनी कळविले आहे. गावातील स्वच्छता करतांना उपसरपंच राजू दमाहे, संतोष शुक्ला माजी सैनिक, किशोर दमाहे माजी सरपंच, चंद्रशेखर दमाहे, संदिप भोंगाडे, प्रदीप लिल्हारे, तोशीब छवारे, निखिल क्षीरसागर, अतुल गुरुभेले रोजगार सेवक, संतोष कटरे, अक्षय दमाहे, विजय निनावे, संदिप भोयर, सेवक केवट, ग्राम पंचायत सदस्य, व समस्त गावकारी उपस्थित होते.
त्यानंतर नंतर दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात शिवाजी जयंती. निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी प्रथम सरपंच सौ. मिताताई किशोर दमाहे, उपसरपंच राजू दमाहे, यांनी छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन वंदन केले, त्या प्रसंगी सेवकराम केवट ग्राम पंचायत सदस्य, दिनेश लिल्हारे सदस्य, अरविंद कांबळी सदस्य, सूर्यकांताताई मदनकर सदस्य, धनवंताताई पराते सदस्य, तेजश्रीताई कटारे सदस्य, हंसकलाताई धावडे सदस्य, मंगलाताई पात्रे सदस्य इत्यादी ग्राम पंचायत सदस्य व गावातील नागरिक सर्व समितीचे पदाधिकारी सदस्य, उपस्थित होते.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space