तिरोडा तालुक्यातील ग्राम कवलेवाडा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या पुरस्कारास पात्र

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

तिरोडा तालुक्यातील ग्राम कवलेवाडा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या पुरस्कारास पात्र.
राकेश बोरकर
तालुका प्रतिनिधी तिरोडा
तिरोडा :- गोंदिया जिल्ह्यात सन 2019-20, 2020-21, 2021-22 या वर्षात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत एकत्रित स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यांना त्या अनुषंगाने तालुका स्तरावरील व जिल्हा स्तरावरील प्रथम, द्वितीय, व तृतीय तसेच विशेष पारितोषिक पात्रता धारण करणाऱ्या ग्राम पंचायतींना प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्याकरिता दिनांक 28/02/2023 ला जिल्हास्तरावर न्यू ग्रीनलँड लॉन बालाघाट रोड, गोंदिया येथे सरपंच परिषद व प्रशिक्षण संकल्प मेळावा आयोजित केलेला आहे.
त्या निमित्त प्रमुख अतिथीच्या उपस्थितीत व हस्ते तालुका व जिल्हा स्तरावरील प्रथम, द्वितीय, तृतीय, व विशेष पुरस्कारास पात्रताधारक ग्राम पंचायतींना तेथील, सरपंच, उपसरपंच, ग्राम सेवक यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात येणार असून तिरोडा तालुक्यातील ग्राम कवलेवाडा, चूरडी, बेरडीपार खु. नवरगाव, नवेझरी, नहरटोला, खैरलांजी, इत्यादी गावाचा समावेश आहे. कवलेवाडा ग्राम पंचायत चे माजी सरपंच व सध्या हयातीत असलेले जिल्हापरिषद सदस्य किरण पारधी यांनी आपल्या गावात सर्वांच्या सहकार्याने स्वच्छतेची सुरुवात केली होती त्याचे फळ आज म्हणून त्यांना प्रशस्ती पत्र प्रदान होणार आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
