नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , मुंडीकोटाची IDBI बँक ठरत आहे सामान्य नागरिकांसाठी डोके दुःखी, परिसरातील ग्रामपंचायत चे शासकीय आर्थिक व्यवहारही बँकेच्या भोंगळ कारभाराने पडले ठप्प विकास कामाला लागला ब्रेक – जनता टाइम्स न्यूज

मुंडीकोटाची IDBI बँक ठरत आहे सामान्य नागरिकांसाठी डोके दुःखी, परिसरातील ग्रामपंचायत चे शासकीय आर्थिक व्यवहारही बँकेच्या भोंगळ कारभाराने पडले ठप्प विकास कामाला लागला ब्रेक

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

मुंडीकोटाची IDBI बँक ठरत आहे सामान्य नागरिकांसाठी डोके दुःखी, परिसरातील ग्रामपंचायत चे शासकीय आर्थिक व्यवहारही बँकेच्या भोंगळ कारभाराने पडले ठप्प विकास कामाला लागला ब्रेक

 

(ATM मशीन) सुद्धा बँकच्या भोंगळ कारभाराने झाली बंद, खातेधारकांची होते गैरसोय, सोयी – सुविधाचा अभाव, ग्राम पंचायतीचे शासकीय खाते इतर बँकेत जाण्याची दाट शक्यता

 

महेंद्र नंदागवळी

मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)

गोंदिया :- मुंडीकोटा येथील आय. डी.बी.आय. बँक हे सर्व सामान्यासाठी डोके दुःखी ठरत आहे खाते बँक पासबुक प्रिंट करण्यासाठी मुंडीकोटा परिसरातील वृद्ध, मजूर, महिला, कामगार, व्यापारी, शेतकरी, ग्राम पंचायत व सर्वसामान्य वर्गाला करावी लागते पायपीट बँकेत अनेक दिवसापासून सोयी सुविधाचा अभाव.

बँकेने सुरु केलेले ATM मशीन सुद्धा बँकेच्या देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधाचा अभावामुळे बँक प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे पूर्णतः बंद करण्यात आले आहे. ATM मशीन उपलब्ध होती मात्र त्यात नोटांचा अभाव.

बँकेने धनवर्षा यंत्र स्थापन केले मात्र त्यात धनच राहत नसल्याने धनाची वर्षा होत नसत. खात्यात उपलब्ध असलेल्या धनाची माहिती घेतली तर नेट अभावी माहिती देणाऱ्या यंत्रनेशी संपर्क होईना अशी अवस्था बँकेने धनवर्षा यंत्राची केली (ATM) यंत्र बंद केले मात्र बँकेचे धनवर्षा यंत्राशी संपर्क करणारे स्मार्ट डेबिट कार्ड आजही अद्यावत आहे.

नेटवर्क, पैश्याचा अभाव नेहमी राहत असल्याने बँकेने केलेल्या दुर्लक्षपणामुळे तेही कूचकमी ठरले सो-पीस बनवून ठेवलेले ATM शेवटी बँकेला कायमचे बंद करावे लागले.

मुंडीकोटा परिसरात राष्ट्रीय स्तराची बँक म्हणून आय.डी.बी.आय बँकेची शाखा सुरु करण्यात आली आहे. त्या मध्ये परिसरातील मजूर, महिला, वृद्ध नागरिक, कामगार वर्ग, व्यापारी वर्ग, शाळेच्या विद्यार्थ्यांचे, शेतकरी, ग्रामपंचायतीचे व इतर कर्मचाऱ्यांचे खाते ह्या बँकेत आहेत मात्र खाते धारकांना देण्यात येणाऱ्या सुविधाच्या अभावाने ही बँक परिसरात खाते धारकांसाठी मोठे डोकेदुखी ठरली आहे.

ग्राम पंचायतीच्या निवडणुका होऊन गोंदिया जिल्ह्यात 13/01/2023 पर्यंत ग्राम पंचायतीने सत्ता स्थापन करुन पहिल्या सभा घेतल्या आहेत. त्याच बरोबर ग्राम पंचायतीचे पुढचे आर्थिक व्यवहार, शासकीय, विकास कामे करण्यासाठी मुंडीकोटा परिसरातील IDBI बँकेत असलेले खाते नवनियुक्त सरपंच/सचिव/ गट विकास अधिकारी यांचे नावाने व स्वाक्षरीचे बदल करण्यासाठी बँकेत देवून बराच काळ झाला असून सुद्धा आज जवळपास दोन महिने होत असून अजून पर्यंत ग्राम पंचायतीच्या बँक खात्यात सुधारणा करण्यात आलेली नाही.

परिणामी ग्राम पंचायतीचे सर्व शासकीय आर्थिक व्यवहार बँकेच्या वेळेत देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा अभावी भोंगळ कारभारामुळे ठप्प पडले असून त्याचा परिणाम सार्वजनिक कामावर पडत आहे.

बँक वेळेत सोयी-सुविधा देण्यास अपयशी ठरत असल्याने नागरिकांना पायपीट, कसरत करावी लागत असल्याने बँकेचे खातेधारक, ग्राम पंचायतीचे सर्व शासकीय खाते, आर्थिक व्यवहार बंद करुन दुसऱ्या बँकेच्या मार्गावर लागण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.

बरेच दिवसापासून सर्व सामान्य नागरिकांना बॅंकेकडून देण्यात येणाऱ्या सुविधा अभावी खातेधारकांना कमालीची कसरत करावी लागत आहे. सदर बाबीची दखल वरिष्ठ बँक अधिकारी, प्रशासन, जिल्हाधिकारी यांनी घेऊन बँक प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला चपराक लावावी अशी मागणी परिसरातील नागरिक खातेधारक यांच्याकडून होत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now