शिक्षण विभागातील केंद्राच्या गांगला येथिल केंद्र प्रमुखला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 9000 हजार रुपयाची लाच स्विकारतांना केली अटक
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
शिक्षण विभागातील केंद्राच्या गांगला येथिल केंद्र प्रमुखला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 9000 हजार रुपयाची लाच स्विकारतांना केली अटक
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
तिरोडा :- तिरोडा तालुक्या अंतर्गत गांगला येथील शिक्षण विभागाच्या अधिनिस्त कार्यरत असलेले केंद्र प्रमुख धनपाल श्रीराम पटले वय 47 वर्ष रा. नेहरू वॉर्ड तिरोडा यांनी दिनांक 03/03/2023 ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 9 हजार रुपयाची लाच स्विकारल्या प्रकरणी अटक करण्यात आली.
तक्रारदार हे पेशाने शिक्षक असून त्यांची प्रकृती बरी नसल्याने ते माहे डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत वैद्यकीय रजेवर होते, त्यांची प्रकृती बरी झाल्यानंतर जानेवारी मध्ये आपल्या कर्तव्यावर हजर झाले. परंतु त्यांच्या वैद्यकीय रजा कालावधीतील पगार न मिळाल्याने गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती तिरोडा यांच्याकडे रजा मंजूर करुन पगार काढ्यासाठी आवश्यक असलेल्या दस्ताऐवजासह अर्ज दाखल केला. मात्र रजा मंजूर करुन वेतन अदा करण्यात आलेले नाही.
आरोपी केंद्रप्रमुख याने गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती तिरोडा यांच्या कडून रजा मंजूर करुन वेतन काढण्यासाठी 10,000/- रुपये लाचेची मागणी केली होती, तडजोडी अंती 9000/- हजार रूपये लाचेची मागणी करण्यात आली मात्र तक्रारदार याची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारी नंतर ACB ने सापडा रचून आरोपी केंद्र प्रमुख धनपाल पटले यांना 9000/- रुपयाची लाच जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा गांगला येथे स्वीकारतांना अटक करुन ताब्यात घेण्यात आले व नंतर पोलीस स्टेशन तिरोड्याला गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही करण्यात आली.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गिते, पोलीस उप अधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्ददर्शनात पोलीस निरीक्षक सारंग मिराशी, पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, स.फौ. विजय खोब्रागडे, पो. हवा. संजय बोहरे, नापोशी संतोष शेंडे, मंगेश काहालकर, संतोष बोपचे, अशोक कापसे, चालक दीपक बतबर्वे यांनी पार पाडली
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space