राज्यात मनरेगा च्या बांधकामात तिरोडा तालुका प्रथम गट विकास अधिकारी सतीश लिल्हारे यांचा सरपंच संगठनेने केला सत्कार
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
राज्यात मनरेगा च्या बांधकामात तिरोडा तालुका प्रथम गट विकास अधिकारी सतीश लिल्हारे यांचा सरपंच संगठनेने केला सत्कार
प्रशासनाच्या सहकार्या शिवाय यश गाठने कठीण अध्यक्ष भांडारकर यांचे वक्तव्य
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
तिरोडा :- मनरेगाच्या माध्यमातून तालुक्यातील लोकांना रोजगार निर्माण करुन देणे, वयक्तिक लाभ मिळवून देणे व कुशल, अकुशल इतर बांधकाम कामे मनरेगाच्या माध्यमातून करण्यात तिरोडा तालुका महाराष्ट्र राज्यात प्रथम आल्याने त्यानिमित्त मुंबई येथे राज्यपाल व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गट विकास अधिकारी सतीश लिल्हारे व त्यांच्या टीम चे सत्कार करण्यात आले त्यावेळी टीम मध्ये मेश्रामजी, सहाय्यक अधिकारी सुनिल कटरे, रामप्रसाद बावनकर, खेमचंद तूरकर हजर होते.
गट विकास अधिकारी व त्यांची टीम मुंबई वरून परत कर्तव्याच्या ठिकाणी आल्यानंतर पंचायत समिती तिरोडा येथिल सभागृहात सरपंच संगठनेच्या वतीने सर्व टीम व गट विकास अधिकारी लिल्हारे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी धारगावे सर, पटले सर, भावे सर, अधिकारी पंचायत मेश्रामजी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुनिल कटरे, रामप्रसाद बावनकर, खेमचंद तूरकर यांचे सुद्धा सत्कार करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. कुंता पटले हे सुद्धा व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना BDO लिल्हारे यांनी नवनियुक्त सरपंच यांना गावाचा विकास करण्यासाठी पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या तर गावाचा विकास करतांना तक्रारी भेदभाव न करता गावाचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही समस्या असल्यास माझ्याशी संपर्क करा मी आणि माझे कर्मचारी नक्कीच आपल्याला सहकार्य करतील असेही त्यांनी सांगितले सर्वांच्या सहकार्याने शासन प्रशासन यांच्या सु-संवादाने गावाचा विकास करणे शक्य आहे असा मार्ग शोधून कामाला लागा असे मार्गदर्शनात संबोधण्यात आले.
त्याच बरोबर सरपंच संगठनेचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी बोलताना सांगितले की नवनियुक्त सरपंच यांनी झाले गेले विसरून वैराचे राजकारण न करता गावाचा विकासाची कामे कश्याप्रकारे करता येईल एखाद्याचा विरोध न करता विरोधकाला आपल बनवून जास्तीत जास्त कामे कशी करता येईल या बाबी कडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शन सहकारर्या शिवाय यश गाठने कठीण आहे.
तसेच तिरोडा तालुका राज्यात मनरेगाच्या कामात प्रथम आला त्याचे श्रेय गट विकास अधिकारी सतिश लिल्हारे व त्यांच्या सर्व टीम, ऑपरेटर ला सुद्धा देण्यात देण्यात आला, त्यांचा मदती शिवाय हे यश गाठने कठिन झाले असते असाही वक्तव्य सरपंच संगठनेचे अध्यक्ष व इतर सरपंचानी BDO लिल्हारे शुभेच्छा देत दिलं
या सत्कार समारंभा प्रसंगी सरपंच संगठनेचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर, उपाध्यक्ष विनोद लिल्हारे, सचिव मदनलाल पटले, कोषाध्यक्ष श्यामराव बिसेन, सदस्य सौ. निशा संतोष बावनकर, सौ. भारती झगेकार, छायाबाई टेकाम, अजितभाऊ ठवरे मिडिया प्रमुख, सदस्य हंसराज पारधी, महेश पटले, सौ. सविता दुर्गाप्रसाद अंबुले, सौ. पुष्पकला क्रिष्णा गौतम, भास्कर जुनेवार, सौ. प्रितीताई भांडारकर, सौ. कल्पना दहीकर, सौ. राखी राजकुमार नागपुरे, सौ. मंदाताई टेंभरे सदस्य महिला मिडिया माजी सरपंच राजेंद्र चामट उपस्थित होते.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space