जि. प. शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी आमची शाळा आदर्श शाळा उपक्रम प्रेरणादायी श्रीमती शितल पुंड मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गोंदिया यांचे वक्तव्य
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
जि. प. शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी आमची शाळा आदर्श शाळा उपक्रम प्रेरणादायी श्रीमती शितल पुंड मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गोंदिया यांचे वक्तव्य
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
गोंदिया :- अदानी फाउंडेशन तिरोडा व शिक्षण विभाग जि. प. गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या शाळांकरिता राबविण्यात येणारा आमची शाळा, आदर्श शाळा हा स्पर्धात्मक उपक्रम प्रेरणादायी असून या उपक्रमाच्या माध्यमातून व लोकसहभागातून जि. प. शाळांचा कायापालट होत आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शितल पुंड यांनी केले. अदानी फाउंडेशन द्वारा आयोजित आमची शाळा आदर्श शाळा उपक्रमाच्या बक्षीस वितरण समारोहात श्रीमती शितल पुंड बोलत होत्या.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये DIET, गोंदियाचे प्राध्यापक डॉ. नरेश वैद्य समग्र शिक्षा अभियान चे जिल्हा व्यवस्थापक श्री बाळकृष्ण बिसेन, अदानी फाउंडेशनचे प्रमुख श्री बिमुल पटेल उपस्थित होते. प्रास्ताविकात श्री बिमुल पटेल यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी अदानी फाउंडेशन सदैव तत्पर असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नेहमीच सहकार्याची भूमिका राहील असे त्यांनी सांगितले.
शिक्षणाधिकारी डॉक्टर महेंद्र गजभिये यांनी आमची शाळा आदर्श शाळा या उपक्रमाची प्रशंसा करताना या उपक्रमाच्या माध्यमातून जि. प. च्या शाळांमध्ये गुणवत्ता वाढ व भौतिक विकास लोकसहभागातून होत आहे असे सांगताना विजेता शाळांचे अभिनंदन केले. तसेच डॉ. नरेश वैद्य यांनी स्पर्धेच्या मूल्यांकनाविषयी सांगून विजेता शाळांना शुभेच्छा दिल्या.
आमची शाळा आदर्श शाळा स्पर्धा सत्र 2022- 23 मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, खर्रा प्रथम, जि. प. उच्च प्राथमिक शाळा बोदलबोडी द्वितीय, जि. प. उच्च प्राथमिक शाळा हिरडामाली तृतीय याप्रमाणे क्रमांक पटकाविला. जिल्हास्तरीय विजेता तीनही शाळांना अदानी फाउंडेशन तर्फे अनुक्रमे 1 लाख 21 हजार व स्मृतिचिन्ह, 75 हजार व स्मृतिचिन्ह, 51 हजार व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तर तालुकास्तरावर प्रथम जि. प. उच्च प्राथमिक शाळा मोरगाव तर द्वितीय उच्च प्राथमिक शाळा माहूरकूडा तालुका अर्जुनी मोरगाव, आमगाव तालुका प्रथम जि. प. उच्च प्राथमिक शाळा करंजी तर द्वितीय जि. प. उच्च प्राथमिक शाळा शिवनी, देवरी तालुका प्रथम जि. प. उच्च प्राथमिक शाळा डवकी तर द्वितीय जि. प. उच्च प्राथमिक शाळा घोणाडी, गोंदिया तालुक्यातून प्रथम जि. प. उच्च प्राथमिक शाळा खर्रा तर द्वितीय जि. प. उच्च प्राथमिक शाळा रापेवाडा, गोरेगाव तालुक्यातून प्रथम जि. प. उच्च प्राथमिक शाळा हिरडामाली तर द्वितीय क्रमांक जि. प. उच्च प्राथमिक शाळा सटवा, सालेकसा तालुक्यातून जि. प. उच्च प्राथमिक शाळा बोदलबोडी तर द्वितीय जि. प. उच्च प्राथमिक शाळा झालिया, सडक अर्जुनी तालुक्यातून प्रथम जि. प. उच्च प्राथमिक शाळा पळसगाव तर द्वितीय जि. प. उच्च प्राथमिक शाळा घोटी, तिरोडा तालुक्यातून प्रथम जि. प. उच्च प्राथमिक शाळा खैरलांजी तर द्वितीय जि. प. उच्च प्राथमिक शाळा चिखली यांनी पटकावला वरील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या शाळांना अदानी फाउंडेशन तर्फे प्रत्येकी रोख 45 हजार रुपये व स्मृतिचिन्ह तसेच 30 हजार रुपये व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच उत्कृष्ट गटशिक्षणाधिकारी म्हणून श्री विशाल डोंगरे पंचायत समिती सालेकसा श्री जनार्दन राऊत पंचायत समिती गोंदिया व श्री नीलकंठ शिरसाटे पंचायत समिती गोरेगाव यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच उत्कृष्ट केंद्रप्रमुख म्हणून एस एम भैसारे, बी. एन. बोरकर, सौ. निशा बोदले, गुलाब भुसारी, एस. जी. कश्यप, एन. एस. लंजे, एस. एम. पडोळे, के. आर. गोटेफोडेे , यु. एम. बोपचे, एन. सी. बीजेवार, के. आर. वासनिक, बी. के. चांदेकर, धनराज पटले, विजेंद्र सिंग राठोड, तेजलाल भगत, यु. पी. बिसेन इत्यादींना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अदानी फाउंडेशन कार्यक्रम अधिकारी श्री राहुल शेजव यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अदानी फाउंडेशन चे श्री कैलाश रेवतकर, स्वप्निल वाहने, मिनेश कटरे, अपूर्वा पाटील यांनी सहकार्य केले.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space