ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे भविष्य शिक्षकांच्या संपाने आले धोक्यात शासन, प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे भविष्य शिक्षकांच्या संपाने आले धोक्यात शासन, प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी
प्रेस संपादक व पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे विदर्भ संघटक महेंद्र नंदागवळी यांची मागणी
प्रकाश रामटेके
विदर्भ ब्युरो चिफ
विदर्भ नागपुर :- कोरोना काळात विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले असून आजही त्याची भरपाई निघण्यास आहे. जुन्या पेन्शनच्या मागणी साठी महाराष्ट्र राज्यात सर्व आस्थापने, प्रशासकीय कामकाज बंद आहेत त्यात राज्यातील सर्व जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षकांनी, त्यांच्या संघटनानी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी पाठिंबा दिला असून जिल्हापरिषद शाळा सुद्धा बंद पडल्या आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असून मार्च महिन्याच्या शेवटी त्यांचे शैक्षणिक सत्राची परीक्षेची वेळ असतांना शिक्षक शाळेत येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे विद्यार्थ्यांना वेठीस धरून त्यांच्या भविष्य धोक्यात घालुन न्याय मागणे हे संयुक्तिक नाही.
काही ठिकाणी विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात गुरुजीच्या मागणीसाठी स्वतः विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलनही केले, जिल्हा परिषद शाळेत बहुतेक ठिकाणी खूप मोठ्या ग्रामीण भागातील गोर-गरीब मजूर, विधवा भगिनी, दिव्यांग बांधव, कामगार या सर्व सामान्यांची मुले त्या शाळेत शिक्षण घेत आहेत. या शासकीय शाळेत आपल्या मुलांना शिक्षण देऊन पालक आपला मुलगा, मुलगी कलेक्टर, पोलीस, अधिकारी, कर्मचारी, चांगला नेता, मुख्यमंत्री, मंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल, वैज्ञानिक, डॉक्टर, सैनिक पायलट, घडवण्याची स्वप्नने पाहतात मात्र कोरोना काळात राष्ट्रीय आपत्ती मुळे व आता शिक्षकांच्या संपामुळे शाळा बंद असल्याने त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
शासन, प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात न घालता त्याची पर्यायी व्यवस्था तात्काळ उपलब्ध करावी. त्याच बरोबर जुन्या पेन्शन करीता होत असलेल्या संपवार लवकरात लवकर तोडगा काढून सर्व आस्थापने, प्रशासकीय यंत्रणा सुरळीत कामाला लावावी अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे विदर्भ संघटक महेंद्र नंदागवळी यांनी शासन, प्रशासनाला केली आहे.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space