नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद शाळा पांजराच्या विद्यार्थ्यांना अध्यक्षा व समितीने दिला जेवण व जेवणात गोड – जनता टाइम्स न्यूज

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद शाळा पांजराच्या विद्यार्थ्यांना अध्यक्षा व समितीने दिला जेवण व जेवणात गोड

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद शाळा पांजराच्या विद्यार्थ्यांना अध्यक्षा व समितीने दिला जेवण व जेवणात गोड

 

जि. प. शाळेचे आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य शाररिक व बुद्धीने कमजोर करण्याचे शासनाचे धोरण. अद्यापही शाळेत धान्य पुरवठा नाही.

 

राकेश बोरकर

तालुका प्रतिनिधी तिरोडा

तिरोडा :- जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना पांजरा येथे मागील अंदाजे एक महिन्यापासून मुलांना शासनाने धान्य पुरविले नसल्याने विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण मिळत नाही, त्यांच्या तोंडातील घास हिसकावून शासन शिधापत्रिका धारकांना राशन दुकानामार्फत गुडीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा दिला.

 

मात्र जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्या कडे जन प्रतिनिधी, मंत्री, प्रशासन यांनी दुर्लक्ष केले आहे त्यांना रोड, रस्ते, नाली बांधकामाच्या उदघाटना पासून फुरसत नाही. इकडे आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे भविष्य शाररिक, व बुद्धिने कमजोर करण्याचे काम शासन, प्रशासन करत आहे. देशाचे भविष्य घडविन्या पेक्षा स्वतःचे भविष्य घडवत असल्याची चर्चा जन सामान्यात आहे.

 

एक पाऊल पुढे शाळा व्यवस्थापन समिती पांजरा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 15/04/2023 ला जिल्हा परिषद शाळा पांजरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या अध्यक्षा सौ. प्रणोती महेंद्र नंदागवळी यांनी व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना शाळेत गोड जेवण दिले त्यात भात, भाजी, वरण, खीर, पुरी, कळी देऊन विद्यार्थ्याचा आनंद द्विगुणित केला.

 

या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. प्रणोतीताई नंदागवळी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. रामेश्वर बावनकर सर, सौ. द्रौपदी साखरकर मॅडम, शीतल मारबदे मॅडम, रेश्मा रहांगडाले मॅडम, कमलाबाई गाढवे बाई, मंजुषाबाई आस्वले बाई, सदस्य सौ. योगेश्वरी मुकेश पटले, सौ. संगीताबाई अनिल पटले, सौ. हेमलता महेश कुंभरे, समितीचे सर्व सदस्य, तसेच ग्रामपंचायत सरपंच सौ. शारदा राजेंद्र चामट, ग्राम पंचायत सदस्य अमोल चामट, सौ. सुषमा उकेबोन्द्रे, सौ. वर्षा आस्वले, सर्व सदस्य, उपस्थित होते.

 

शासन, प्रशासनाने दिव्यांग, विधवा महिला, गरीब, मजूर, शेतकरी, कामगारांच्या मुलांचे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या तोंडातील घास हिसकावून त्यांना बौद्धीक व शाररिक कमजोर करुन शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देत एकाला उपाशी तर एकाला तुपाशी धोरण अवलंबिने अन्यायकारक महेंद्र नंदागवळी (विदर्भ संघटक), प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र. यांची प्रतिक्रिया.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now