प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य. च्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिनी डॉ. ए. पी. के. संघरत्ने, समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य. च्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिनी डॉ. ए. पी. के. संघरत्ने, समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
प्रकाश रामटेके
विदर्भ ब्युरो चिफ,
भंडारा :- भंडारा जिल्ह्यामधील पवनी तालुक्यातील अड्याळ येथील सामाजिक कार्यकर्ते व व्यवसायाने डॉ. असलेले ए. पी. के संघरत्ने यांचा आज १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्या साधून अड्याळ येथिल मुन्ना सभागृह येथे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनात
वैद्यकीय क्षेत्रात कर्तव्यनिष्ठ राहून आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षितेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याची पावती म्हणून संघरत्ने यांना मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ, देऊन जिल्हास्तरीय समाजरत्न पुरस्काराने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने गौरविण्यात आले.
डॉ. संघरत्ने हे परिसरातील रुग्णांकडून अत्यअल्प फी आकारून रुग्णांची सेवा करीत असतात. रात्री- बेरात्री कुणाचे फोन आला तर त्यांच्या मदत कार्यात नेहमी तत्पर असतात. वेळेवर गरीब रुग्णांकडे पैसे नसले तर सेवा भावनेने मोफत उपचार करतात. समाजकार्यात नेहमी मदत करतात त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हास्तरीय समाजरत्न पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, विदर्भ संघटक महेंद्र नंदागवळी, भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, शंकर भेंडारकर, संजय नासरे, के. एल .गजभिये, दिलीप मोटघरे, प्रशांत रामटेके, पारमिद मोटघरे, बालाजी लांजेवार, नितीन राऊत, अमित रामटेके, यशवंत वैद्य, उमराव सेलोकर, अमित तिरपुडे, कुंजन शेंडे व असंख्य नागरिकांना यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
ते समाजरत्न पुरस्काराने सन्मानित झाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीत करीता शुभेच्छा देण्यात आल्या.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
