महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहन झालेच नाही
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहन झालेच नाही
संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई होईल का ?
सुनिल गेडाम
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
सिंदेवाही :- ग्राम पंचायत म्हटलं तर गाव विकासाचा दुवा आहे असे म्हणतात.मात्र सिंदेवाही तालुक्यातील काही ग्राम पंचायत अंधारातच दिसत आहेत.हे यावरून निदर्शनास येते की दिनांक 1 मे 2023 ला महाराष्ट्र दिनी बहुतांश तालुक्यातील ग्रा.पं.कार्यालयात ध्वजारोहन कुणी केलेच नाही.असा हा पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत. येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालयातील प्रकार आहे, शासनाचा आदेश असूनही ग्राम पंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिनी ध्वजारोहन झालेच नाही.असे प्रत्यक्षात पाहणी केले असता लक्षात आले.त्यामुळे यापूर्वी सुद्धा या ग्राम पंचायत कार्यालयात इतरही शासकीय कार्यक्रम व शासनाच्या आदेशाची अमलबजावणी कितपत होत असेल याची प्रचिती या प्रकारावरून लक्षात येत आहे.गावाचे नेतृत्व करणारे ग्राम पंचायतचे लोक प्रतिनिधी जर अशा अंधारात असतील तर गावच्या नागरिकांना विकासाचा सूर्य बघायला मिळेल कि नाही हे न समजणारेच कोडे आहे.पण
काही लोकप्रतिनिधी
हे रोडचे काम करणाऱ्यासोबत कोंबड पार्ट्या करायला वेळ काढतात.मात्र अशा कार्यक्रमाला महत्व का देत नाही.असे येथील नागरिकांत चर्चिले जात आहे.तेव्हा जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे याकडे लक्ष वेधून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करतील का ? याकडे समस्त जणांचे लक्ष लागले आहे.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space