गावातील मजूर, कामगारांचे परराज्यात व शहरात रोजगारासाठी स्थलांतर राज्य सरकार स्थानिकांना रोजगार देण्यास ठरली अपयशी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

गावातील मजूर, कामगारांचे परराज्यात व शहरात रोजगारासाठी स्थलांतर राज्य सरकार स्थानिकांना रोजगार देण्यास ठरली अपयशी
महात्मा गांधी रोजगार हमी योजना पडली ठप्प
शासन, प्रशासन बसलेत गप्प
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात दर वर्षी जानेवारी किंवा फरवरी महिन्यात प्रत्येक ग्राम पंचायत क्षेत्रात महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत गावातील प्रत्येक जॉब कार्ड धारकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येते.
मात्र या वर्षी शासन स्थानिकांना रोजगार देण्यात अपयशी ठरली आहे. गावातील मजूर, कामगार वर्गातील कुठुम्बाची, परिवाराची उपजीविका भागवने हाताला काम नसल्याने बेरोजगारी मुळे कठीण झाले आहे.
कित्येक ग्राम पंचायत सरपंचांनी रोजगार हमी योजनेची कामे सुरु करण्याची शासन व प्रशासनाला मागणी केली हे प्रश्न कामगार, मजुराचे ग्रामीण भागातील नागरिकांचे त्यांच्या परिवाराचे आहेत 5 वा मे महिना लोटत चालला असुन त्याकडे शासनाला लक्ष देण्याची फुरसतच दिसत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. शासन रोजगार देण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता स्थानिकांनी रोजगार हमी योजना व शासनाच्या भरवश्यावर न राहता रोजगारा अभावी दुसऱ्या राज्यात व शहरी भागात रोजगारा साठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करने सूरू केले आहे.
गावातील नागरिकांना दुसऱ्या राज्यात रोजगारासाठी स्थलांतर करत असल्याचे पाहून कित्तेक गावातील सरपंचांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे त्याबाबत निवेदन सुद्धा शासन, प्रशासनाला देण्यात आले.
या योजनेतून जॉब कार्ड धारकांना शेतकऱ्यांना मजुरांना, काम त्याच बरोबर त्यांचे राहणीमान उंचावन्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत घरकुल बांधकाम मजूरांना, कॅटल शेड मजुरांना बांधकामाचे पैसे सुद्धा मिळतात मात्र 4 ते 5 महिने लोटूनही दमडीही मजुरांना देण्यात आलेली नाही त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला मिळाला नसल्याने त्यांनी उपजीविका कशी भागवावी जीवनाचा चरिथार्थ कसा चालवावा हा मोठा गंभीर प्रश्न कामगार मजुरात निर्माण झालं आहे ग्राम पंचायत शासन, प्रशासन सुद्धा या विभागाच्या कार्य प्रणालीने त्रस्त झाले आहेत. विकास कामाचा पैसा देतांना लागतो 6 महिने किंवा 1 वर्षाच्या वर कालावधी, मजुरांना हाताला काम नसल्याने आता मजूर दुसऱ्या राज्यात, शहरात पालयन करत आहेत.
महात्मा गांधी रोजगार हमी योजना पडली ठप्प
तरी शासन, प्रशासन का बसलेत गप्प
जन प्रतिनिधिचा शासन, प्रशासनाला सवाल

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
