तिरोडा तालुक्यातील ग्राम पंचायत सुकडी (डाक.) येथे मिनी आंगणवाडी सेविका पद भरतीत घोळ, चौकशी करुन न्याय मिळून देण्याची उमेदवार अर्जदाराची मागणी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

तिरोडा तालुक्यातील ग्राम पंचायत सुकडी (डाक.) येथे मिनी आंगणवाडी सेविका पद भरतीत घोळ, चौकशी करुन न्याय मिळून देण्याची उमेदवार अर्जदाराची मागणी
राकेश बोरकर
तालुका प्रतिनिधी तिरोडा
तिरोडा :- तिरोडा तालुक्यातील आंगणवाडी मधिल रिक्त असलेल्या आंगणवाडी/मिनी अंगणवाडी येथे आंगणवाडी सेविका, मदतनीस पद भरती करीता जाहिरात देण्यात आली. ग्राम पंचायत सुकडी डाक. येथिल मिनी आंगणवाडी पद भरती करीता महिला व बाल कल्याण विभागा मार्फत जाहिरात काढून एकात्मिक बाल विकास प्रकल्प, पंचायत समिती तिरोडा यांच्या कडून भरती प्रक्रिया घेण्यात आली.
त्यात गावातील एकूण 21 महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले, पहिल्यांदा अर्जसोबत जोडलेल्या कागदपत्राची यादी दिनांक 27/03/2023 ला शैक्षणिक पात्रता सोडून प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर शैक्षणिक पात्रता यादी गुणवत्ते नुसार दिनांक 8/05/2023 ला प्रसिद्ध करण्यात आली व त्या प्रसिद्ध केलेल्या यादीवर आक्षेप असल्यास उमेदवाराने दिनांक 12/05/2023 पूर्वी आक्षेप /तक्रार नोंदवावे असे प्रसिद्ध केलेल्या यादीत नमूद होते.
त्यानुसार उमेदवार अर्जदार कल्याणी राजेश मेश्राम रा. सुकडी डाक. यांनी 12/05/2023 ला आक्षेप/तक्रार नोंदविले दिलेल्या आक्षेप तक्रारीवर कोणताही विचार न करता एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी आपल्या मनमर्जी प्रमाणे उमेदवरांना नियुक्ती आदेश दिले आहेत.
अशी तक्रार उमेदवार, अर्जदार कल्याणी राजेश मेश्राम यांनी सखोल चौकशी करुन न्याय मिळवून देण्यासाठी मुख्य कार्यपालन, अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया, अध्यक्ष, जि. प. गोंदिया, सभापती, महिला व बालकल्याण जि. प. गोंदिया, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण जि. प. गोंदिया, जगदीश बावनथडे, सदस्य जि. प. गोंदिया, सभापती, पंचायत समिती तिरोडा, उपसभापती, पंचायत समिती तिरोडा, विजय बिंझाडे, पंचायत समिती सदस्य तिरोडा यांना तक्रार दिली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
