अखेर माजी ग्राम पंचायत सदस्यांचा बैठकी भत्ता मिळाला प्रहार ने शासन व प्रशासन, मुख्यमंत्री दरबारी केली होती मागणी जनता टाइम्स च्या बातमीची शासनाने घेतली दखल.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

अखेर माजी ग्राम पंचायत सदस्यांचा बैठकी भत्ता मिळाला प्रहार ने शासन व प्रशासन, मुख्यमंत्री दरबारी केली होती मागणी जनता टाइम्स च्या बातमीची शासनाने घेतली दखल.
राकेश बोरकर
तालुका प्रतिनिधी तिरोडा
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील ग्राम पंचायत सदस्यांना ग्राम पंचायतीचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपूनही बैठकी भत्ता सदस्यांना मिळालेला न्हवता त्याबाबत चे निवेदन प्रहार पक्षाच्या वतीने गोंदिया जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी वेळो- वेळी प्रशासनास व शासनास देऊन बैठकी भत्त्याची मागणी केली होती.
परंतु कोणती ही कार्यवाही होत नसल्याने प्रत्यक्षात प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर व जिल्हा सचिव महेंद्र नंदागवळी यांनी मंत्रालयात जाऊन प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांना प्रत्यक्षात भेटून सर्व बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या
बच्चू कडू यांनी या बाबत ग्राम विकास मंत्री व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून सर्व परिस्थितीची माहिती अवगत करुन दिली. व विविध मागण्याचे निवेदन त्याच बरोबर ग्राम पंचायत सदस्य बैठकी भत्ता बाबत निवेदन प्रहार गोंदिया मार्फत मंत्रालयात दिले.
आपण अवगत केलेल्या माहितीची दखल घेऊन लवकरात – लवकर भत्ता देऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना संभाषित केले, त्याची पोच आज जिल्हापरिषद गोंदिया येथे ग्रा. पं. सदस्य बैठकी निधी प्राप्त झाली. माजी ग्राम पंचायत सदस्यांना त्यांचा हक्काचा बैठकी भत्ता प्रहारच्या माध्यमातून शासन प्रशासनाशी वेळो वेळी मागणी करुन, त्यांच्या न्यायासाठी लढून बैठकी भत्ता मिळवून दिल्याने माजी ग्राम पंचायत सदस्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यांच्या रास्त मागणीला ग्राम पंचायत चा कार्यकाळ संपल्या नंतरही जोर धरून सदस्यांना न्याय मिळवून दिल्या बद्दल जिल्ह्यातील सर्व माजी ग्राम पंचायत सदस्यांनी प्रहाचे संस्थापक अध्यक्ष बचूभाऊ कडू तसेच गोंदिया जिल्हाध्यक्ष भांडारकर तसेच प्रहार पक्षाचे यांचे आभार मानले. जनता टाइम्स ने त्याबाबत बातमी प्रकाशित केली होती,
आता तरी देवा मला पावशील का!
भत्ता कश्याला म्हणतात दावशील का!
त्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली व निधी मिळाली देव पावला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
