ग्राम पंचायत मधील भ्रष्ट कारभार! चौकशी करायला कुणीच नाही तयार !

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

ग्राम पंचायत मधील भ्रष्ट कारभार! चौकशी करायला कुणीच नाही तयार
विशेष बातमी : सुनील गेडाम (मुख्य पत्रकार )
लाडबोरी: गावाची विकासाचा केंद्र बिंदू व गावाची ससंद म्हणून ज्याच्या कडे बघितले जाते ती म्हणजे ग्राम पंचायत या ग्राम पंचायत मध्ये गावातील नागरिकांनी आपल्या मताच्या अधिकारातून गावाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी ना निवडून देण्यात आले, पण निवडून आलेले सत्ता लोकप्रतिनिधी गावाचा विकास न करता स्वतःचा स्वार्थ साधतं गावातील नागरिकाच्या कडून मिळत असलेल्या टॅक्स चा व त्यांचा घामाच्या दामाचा निधी हा सत्तापक्ष मधील लोकप्रतीनिधी आपल्या मर्जीने मनमानी पणा करीत नियमाबाह्य खर्च करीत असल्याने, सामान्य नागरिकांच्या मिळकती ची उधळपट्टी बाबत ग्राम पंचायत मधील विरोधी पक्षनेते व ग्राम पंचायत सदस्य कमलाकर बोमनपल्लीवार यांनी पंचायत समिती सिंदेवाही इथे दिनांक 02/05/2023 ला
तक्रार दाखल केली, पण दाखल केलेल्या तक्रारीवर विस्तार अधिकारी ( पंचायत ) यांनी बराच कालावधी झाला तरी
अजूनही कोणतेही चौकशी केली नाही ,त्यामुळे व्यथित होऊन नाईलाजाने ग्राम पंचायत मधील भ्रष्ट कारभार ची पोलखोल झाली पाहिजे या साठी आंदोलनाचे हत्यार उपसले! त्यांनी सरळ आरोप करीत तालुक्यात होत असलेल्या ग्राम पंचायत च्या भ्रस्टाचाराला सर्वस्वी गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी ( पंचायत ) यांचा पाठिंबा आहे, आज ग्रामपंचायत मधील सत्तेवर असणारे लोकप्रतिनिधी व कर्मचारी भ्रष्ट कारभार करीत आहे, असे स्पस्ट पणे दिसून येत आहे , त्यामुळे गावातील नागरिकांनी आपला प्रतिनिधी म्हणून लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी नी जनतेच्या पैश्याची होत असलेली उधळपट्टी बाबत तक्रार करून चौकशी ची मागणी केली पण केलेल्या तक्रारीवर चौकशी केल्या जात नाही, लोकप्रतिनिधी च्या तक्रारी दखल घेतली जात नाही तिथे सामान्य नागरिकाच्या तक्रारीवर किती चौकशी करीत असतील असा प्रश्न निर्माण होत आहे, म्हणून अश्या बेपर्वा अधिकारी वर्गाच्या कामाकाजाच पितळ जनतेसमोर उघड आणी यांना नागड करण्यासाठी संविधानिक मार्गाने तहसील कार्यालय सिंदेवाही समोर दिनांक 30/05/2023 ला रोज मंगळवार ला गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी ( पंचायत) पंचायत समिती सिंदेवाही यांचा जाहीर धिक्कार व निषेध आंदोलन करण्याचा इशारा कमलाकर बोमनपल्लीवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
