
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

भीम आर्मी संघटना च्या आंदोलना नंतर लाडबोरी ग्राम पंचायत च्या सामान्य फंडाची चौकशी सुर
विशेष बातमी : सुनील गेडाम / मुख्य पत्रकार (महा.)
लाडबोरी: ग्रामपंचायत कार्यालय मधील विद्यमान सदस्य तथा विरोधी पक्ष नेते श्री कमलाकर बोमनपल्लीवार यांनी सामान्य फंडाच्या नियमाबाह्य करीत असलेल्या खर्चाची होत असलेली हेराफेरी बाबत संबंधित सरपंच व सचिव कडून ती वसुल करण्यासाठी पंचायत समिती सिंदेवाही मधील गट विकास अधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल केली, पण सदर तक्रारीवर कोणतीही कारवाही होत नसल्याने त्रस्त होऊन
भीम आर्मी संघटना तालुका व शहर मधील कार्यकारणीला आपली व्यथा कळवली, नागरिकाच्या घामाचा आणी कष्टा चा पैसा सत्ता पक्ष मनमानी पणाने उधळपट्टी करीत असल्याने याची चौकशी झालीच पाहिजे या करीता संपूर्ण कार्यकारणी या प्रतिनिधी च्या पाठीशी खंभीर पणे न्याय मिळवून देण्यासाठी उभी राहिली व दिनांक 30 मे ला संबंधित कार्यलयाला आंदोलनाचा इशारा दिला,पण संबंधित कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांनी या बाबत कोणतीही भूमिका न घेतल्याने शेवटी भीम आर्मी संघटना सिंदेवाही च्या वतीने तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन केले गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली, सदर आंदोलन जनहितार्थ असल्याने याची दखल तालुक्यातील पत्रकार बांधवानी देखील घेतली,व आपल्या परीने सहकार्य करीत प्रशासकीय यंत्रणेला जाग करण्यासाठी आपल्या वृत्त पत्राद्वारे बातम्या प्रसारित देखील केल्या, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला जाग आली व ग्राम पंचायत लाडबोरी मधील सामान्य फंडाची अखेर चौकशी सुरु करण्यात आली, सदर चौकशी अंती नियमाबाह्य केलेल्या रकमेचा हिशोब गावातील संपूर्ण नागरिकासमोर येईल यात काही शंका नाही, ग्राम पंचायत मधील होत असलेल्या भ्रष्टाचार बाबत लोक प्रतिनिधी म्हणून ज्यांनी आवाज उचलला व नागरिकांनी ज्या विश्वासाने आपला प्रतिनिधी म्हणून ग्राम पंचायत मध्ये पाठवीला त्याचा विश्वास अश्या तडफदार लोकप्रतिनिधी सार्थ ठरत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
