नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी नंतरची लांबलेली शिक्षक भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा आमदार विजय रहांगडाले मार्फत शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना परीक्षार्थ्यांचे निवेदन – जनता टाइम्स न्यूज

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी नंतरची लांबलेली शिक्षक भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा आमदार विजय रहांगडाले मार्फत शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना परीक्षार्थ्यांचे निवेदन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी नंतरची लांबलेली शिक्षक भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा आमदार विजय रहांगडाले मार्फत शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना परीक्षार्थ्यांचे निवेदन

 

महेंद्र नंदागवळी

मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)

गोंदिया :- हिवाळी अधिवेशनात मा. शिक्षण मंत्री यांनी 80% शिक्षक भरती ही तात्काळ करु असे आश्वासित केले होते. शिक्षक भरती करीता शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी घेतली मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटूनसुद्धा शिक्षक भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली नाही.

अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी नंतर ची लांबलेली भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली नसल्याने D. Ed व B. Ed. अभियोग्यता धारक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पात्रता धारक विद्यार्थ्यांनी शिक्षक भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा व इतर विविध मागण्याचे निवेदन आमदार विजय रहांगडाले मार्फत शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिले आहे त्यात प्रामुख्याने

1) शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी 2023 अंतर्गत एकाच टप्प्यात 55000 शिक्षकांची भरती करुन अभियोग्यता धारकांना न्याय देण्यात यावा. 2) पवित्र पोर्टल वरती नोंदणी करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यात यावी. 3) जाहिरातीतील सर्व प्रवर्गांना सामान न्याय मिळण्यासाठी प्रत्येक प्रवर्गाच्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार जागा विभागून द्याव्या. 4) निवड यादी सोबत प्रतीक्षा यादी लावण्यात यावी.

5) एका पवित्र पोर्टल मार्फत निवड होऊन नोकरी मिळालेल्या उमेदवारांना पुन्हा पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची संधी देण्यात येऊ नये. 6) विभागीय भरती प्रक्रिया राबविण्यात येऊ नये. 7) 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांची नियुक्ती न करता त्या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी 2023 च्या अभियोग्यता धारकांचीच नियुक्ती करण्यात यावी. 8) शिक्षक भरतीत मागास वर्गीयांचे 100% अनुशेष भरण्यात यावे. 9) 2017 मधिल शिक्षक भरतीतील विचार करता संस्थेवर मुलाखाती दरम्यान भ्रष्टाचाराची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. त्याकरीता संस्थेवरील पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या भरतीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मुलाखात प्रक्रिया रद्द करुन थेट मेरिटनुसार नियुक्ती देण्यात यावी. 10) संच मान्यता करतांना विद्यार्थ्यांचा ‘आधार’ आधारित करू नये, कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकडे आधार उपलब्ध नसल्या कारणास्तव विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहन्याची शक्यता आहे. 11) 2022-23 चे संच मान्यता करतांना विद्यार्थ्यांच्या पट संखेनुसारच सरल पोर्टल द्वारे करण्यात यावी. 12) सध्या आपल्या जिल्ह्यातील रिक्त पदांचा खुलासा सात दिवसात करण्यात यावा. 13) उर्दू माध्यम विद्यार्थ्यांना पसंतीक्रम देतांना दहावीचे माध्यम गृहीत धरावे. इत्यादी विविध मागन्यांचा समावेश निवेदनात आहे. निवेदन देतांना हितेश सिंगनजुडे, कुणाल वासनिक, अजय अंजनकर, सचिन भालेराव, भूपेन पारधी, गोविंद टेंभरे, सचिन गलबले उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed