रेतीचे टिप्पर व अदानीच्या राखेच्या वाहतुकीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात नियमाला धाब्यावर बसवून होते रेतीची, राखेची वाहतूक महसूल अधिकाऱ्यांचे डोळे बंद नागरिकांच्या डोळ्यात जाते रेतीचे राखळीचे कण

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

रेतीचे टिप्पर व अदानीच्या राखेच्या वाहतुकीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात नियमाला धाब्यावर बसवून होते रेतीची, राखेची वाहतूक महसूल अधिकाऱ्यांचे डोळे बंद नागरिकांच्या डोळ्यात जाते रेतीचे राखळीचे कण
पर्यावरण व प्रदूषण, परिवहन पोलीस, महसूल विभाग फक्त नावाचेच
राकेश बोरकर
तालुका प्रतिनिधी तिरोडा
तिरोडा :- चांदोरी रेती घाटावरून भर दिवसा व रात्री रेतीची वाहतूक केली जाते त्यात कोणत्याही नियमाचे पालन केले जात नाही महसूल, पोलीस परिवहन, पर्यावरण प्रदूषण, महसूल अधिकारी हे नागरिकांचा सेवेसाठी नसून रेती, माफियाच्या सुरळीत सेवेसाठी याचा अनुमान सर्व सामान्यांना आहे.
मात्र महसूल अधिकारी रेती वाहतूक होतांना दुर्लक्ष करत आहेत, नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. रस्त्यांनी जातांना एकही रेतीचा, राखेचा एकही कण त्यांच्या डोळ्यात डोळे बंद असल्याने जात नाही मात्र इकडे सर्वसामान्यांचे डोळे निकामी झाले तरी हरकत नाही, स्वसनाच्या त्रास झाले तरी हरकत नाही. भ्रष्ट प्रशासन कारभाराने सर्व सामान्य जनता त्रस्त झाली. ज्यांना नागरिकांना चांगली सुरळीत सेवा देण्यासाठी शासन पगार देते तेच आता जीवावर उठल्याचे दिसत आहे.
तिरोडा तालुक्यात घाटकुरोडा, चांदोरी, बिरोली कवलेवाडा, मांडवी, पिपरिया, बोन्डराणी रेती घाट आहेत, त्याच बरोबर अदानी विद्युत प्रकल्प सुद्धा आहे.
या परिसरातून अदानीची राख, व वाळू घाटातील वाळू टिप्पर ने वाहतूक करतांना नियमाची पायमल्ली करण्यात येते त्यात क्षमते पेक्षा जास्त ब्रास रेती भरल्या जाते, त्यावर त्रिपाल न टाकता वाहतूक केली जाते तर अदानीतून राखेची वाहतून करतांना टिप्पर वरती क्षमते पेक्षा जास्त राख भरून त्याची उंची वाढवत वाहतूक होते.
टिप्पर मध्ये सुद्धा परवानगी नसताना विनापरवानगी ट्रक ची उंची वाढवण्यात आल्या आहे त्यावर संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने सर्वसामान्य नागरीकांना मोटार सायकल, पायदळ, सायकल वाल्यांना गावातील नागरिकांना त्यांच्या डोळ्यात रेतीचे कण, राखड जात असल्याने गंभीर परिस्थिती चा सामना करावा लागत आहे. मात्र प्रशासनातील अधिकारी/ कर्मचारी याकडे डोळे बंद करुन बसले आहेत अश्या बे-जबाबदार कर्मचारी अधिकाऱ्यांवर शासनाने कार्यवाही करावी अशी मागणी जन सामान्यात होत आहे.
होणाऱ्या अवैध वाहतुकीवर, प्रदूषणावर, त्यापासून उद्भवणाऱ्या गंभीर समस्यांकडे जन प्रतिनिधि लक्ष देणार का असाही सवाल जनता टाइम्स च्या माध्यमातून सरकार व जन प्रतिनिधिंना जनतेच्या माध्यमातून होत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
