बयवाडा ता. तिरोडा जि. गोंदिया येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक संपन्न

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

बयवाडा ता. तिरोडा जि. गोंदिया येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक संपन्न
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
तिरोडा :- दिनांक 17 जून 2023 ला तिरोडा तालुक्यातील मौजा बयवाडा येथे सौ. मेघाताई बिसेन राष्ट्रीय ओबीसी महासंघ महिला प्रदेश सहसचिव यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. वाय. टी. कटरे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ होते. या बैठकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणा बाबद व ओबीसी विद्यार्थी वसतिगृह व इतर बाबींवर चर्चा झाली ओबीसींचा लढा हा आत्मसन्मानाचा लढा आहे, सुप्रिम कोर्टाने मागास वर्गियांचा आंतरिम अहवाल नाकारला त्यामुळे देशातील ओबीसी लोकांचे आरक्षण धोक्यात आले यावर आता या देशातील जाती निहाय जनगणना या एकच पर्यायासाठी येत्या 8 आँगस्टला तिरुपती येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 8 वे अधिवेशन आयोजिवले आहे. तरी सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येउन या अधिवेशनात सहभागी होऊन ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढा द्यायला समोर यावे हे मुद्दे या बैठकीत मांडण्यात आले यावेळी श्री. भुमेश्वर पारधी जिल्हा उपाध्यक्ष होते तर प्रमुख उपस्थितीत श्री. चैतराम मलेवार माजी उपसरपंच, श्री. किशोर मलेवार सामाजिक कार्यकर्ता, सौ. कल्पना मलेवार पोलीस पाटील, श्री. सुनील बावानकर, श्री. सेवक मरघडे म.गां.तंटामुक्ती अध्यक्ष, सौ. श्यामकला मलेवार ग्राम पंचायत सदस्य, श्री. व्यंकट मरघडे माजी उपसरपंच व गणमान्य ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी श्री. वानु मलेवार, श्री अमोल मलेवार, श्री. गणेश शेंदरे, श्री. चिंतामण शेंदरे, श्री. वामन मलेवार, श्री. हरिराम चकोले, श्री. चरणदास बावनकर, श्री. गणेश मलेवार, सौ. कल्पना मलेवार बचत गट अध्यक्ष, सौ. उमाबाई मलेवार अंगणवाडी सेविका, सौ. ललिता येरने, श्री. शेषराव मरघडे, श्री. उदाराम मरघडे, सौ. गीताबाई बावनकर, श्री. प्रमोद बावनकर, श्री. गोविंदा मलेवार, श्री. गजानन मलेवार श्री. गरीबचद मलेवार , श्री. हरिदास मलेवार यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन श्री. किशोर मलेवार यांनी केले तर मान्यवरांचे आभार श्री. व्यंकट मरघडे यांनी मानले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
