नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , बच्चू कडू यांचा जन्म दिवसा निमित्त जिल्हापरिषद शाळेत गोर गरीब, कामगार, मजूर वर्गाच्या मुलांना शिक्षण साहित्य, पेढे वाटप व विधवा, बेघर, महिलेच्या घराच्या बांधकामाचे भूमिपूजन – जनता टाइम्स न्यूज

बच्चू कडू यांचा जन्म दिवसा निमित्त जिल्हापरिषद शाळेत गोर गरीब, कामगार, मजूर वर्गाच्या मुलांना शिक्षण साहित्य, पेढे वाटप व विधवा, बेघर, महिलेच्या घराच्या बांधकामाचे भूमिपूजन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

बच्चू कडू यांचा जन्म दिवसा निमित्त जिल्हापरिषद शाळेत गोर गरीब, कामगार, मजूर वर्गाच्या मुलांना शिक्षण साहित्य, पेढे वाटप व विधवा, बेघर, महिलेच्या घराच्या बांधकामाचे भूमिपूजन

प्रहारच्या माध्यमातून दोन जिल्हा परिषद शाळांना घेतले दत्तक

 

राकेश बोरकर

तिरोडा तालुका प्रतिनिधी

प्रहारचे संस्थापक, दिव्यांग कल्यान मंत्रालय, अध्यक्ष बच्चू कडू यांच्या जन्म दिवसानिमित्त गोंदिया जिल्यातील तिरोडा तालुक्यातील मुरमाडी, निलागोंदी, भीमनगर, मुरमाडी या जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक संच, पेन व पेढे वितरित करण्यात आले. त्याच बरोबर नवेझरी येथिल ग. भा. विठाबाई बावनथडे यांना फक्त मुलीच असुन त्यांचा विवाह होऊन ते सासरी नांदावयास गेले त्या विधवा, बेघर, अतिगरजू महिलेच्या घराच्या बांधकामाचे भूमिपूजन करुन प्रहारच्या माध्यमातून बांधकामास सुरुवात करण्यात आली.

तसेच पाटिलटोला भीमनगर शाळेत कोणताही मोबदला न घेता चहाचे दुकान टपरी चालवणारे उच्च शिक्षित, बेरोजगार रवी हेमराज उके हे मांग गरोडी, भटक्या जमातीतील, सर्वसाधारण वर्गातील नागरिकांच्या मुलांना शिक्षित व्हावे म्हणून स्वैच्छेने मोफत शिक्षण देणारे उत्कृष्ट होतकरू युवा यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी प्रहारच्या माध्यमातून शाळेतील विविध समस्याचे निराकरण शासन स्तरावर पाठपुरावा करुन करण्यात येईल, त्याच बरोबर पुढल्या वर्षी 1 ते 4 चवथ्या वर्गातील जे विद्यार्थी शाळेतून प्रथम येथील त्यांना शंभर रुपये पारितोषिक देण्यात येईल, सोनेखारी, व मुरमाडी जिल्हा परिषद या शाळांना विद्यार्थी व शाळेचा सर्वांगीन विकास, सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना योग्य शिक्षण सोयी सुविधा देण्यासाठी प्रहारच्या माध्यमातून या दोन शाळा दत्तक घेत आहो. असे प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक, गावकरी यांना मार्गदर्शन करतांना सांगितले

त्यावेळी प्रहार जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, पंचायत समिती सदस्य सौ. वनिताताई भांडारकर, जिल्हा सचिव नंदागवळी, तिरोडा तालुका उपाध्यक्ष रंजित बागडे, उरकूडा उके, मुरमाडीचे सरपंच सौ. मंदा टेंभरे, उपसरपंच राजू मेहर, सोनेखारी शाळेचे मुख्याध्यापक, मुरमाडी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षिका, स्वयंपाकी मदतनीस, सोनेखारी शाळेचे मुख्याध्यापक, निलागोंदी शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिक्षक, शिक्षिका, स्वयंपाकी मदतनीस, तर भीमनगर शाळेच्या शिक्षिका, शिक्षक, स्वयंपाकी मदतनीस, गोपाळ शेंडे, नरेश ठवकर, राहुल तुमसरे, मुरमाडी ग्राम पंचायत सदस्या सौ. विद्या ठवकर, सौ. उमाबाई मेश्राम, जवाहरलाल पटले ग्रा. प. सदस्य, रुपेश वासनिक, जागेश्वर भांडारकर, कमल सोनटक्के, अमोल इळपाते, खुशाल भोंडेकर, इत्यादी उपस्थित होते.

 

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed