खोपडा व बयवाडा गावात प्रहारच्या शाखेचे उदघाटन शाखा प्रमुख, कार्यकर्त्याचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

खोपडा व बयवाडा गावात प्रहारच्या शाखेचे उदघाटन शाखा प्रमुख, कार्यकर्त्याचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत
इतर पक्षांवरून नागरिकांचा उडाला विश्वास बच्चू कडू यांच्या प्रहारला मोठ्या प्रमाणात पसंती
राकेश बोरकर
तिरोडा तालुका प्रतिनिधी
तिरोडा :- गोंदिया जिल्ह्यात प्रहारचे मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे, इतर पक्षांवरून नागरिकांचा विश्वास उडाला असुन बच्चू कडू यांच्या कार्यप्रणाली त्यांचा सर्वसामान्य नागरिकांच्या, शेतकरी, अपंग, निराधार, मजूर, कामगार यांच्या प्रती असलेली आपुलकी त्यांच्यासाठी असलेली कामाची तळमळ पाहून गोंदिया जिल्ह्यात मोठया प्रमाणात गावागावत प्रहारचे विस्तार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रहार ला पसंती असल्याचेही लोकमुखात आहे. बयवाडा येथे शाखा प्रमुख म्हणून युवराज शेंद्रे, उपाध्यक्ष आशिष आदमने, शाखा सचिव टेकचंद मरगडे, अरविंद मलेवार, अनिल मरगडे, संदिप रोडगे, कमलेश उके, संतोष शेंद्रे, मयुर श्यामकुवर, लक्की आसटकर, रुपेश आसटकर, अनिल मेश्राम, दिपक लिचडे, प्रविण भोंगाडे, अतुल उके, तर खोपडा येथे शाखा प्रमुख म्हणून प्रताप वलके, उपाध्यक्ष अक्षय आदमने, राजेंद्र तिवाडे, नितेश इनवाते, प्रमोद मलेवार, विलास. मरगडे , कमलेश सुरभलावी, प्रमोद वलके, उमेश शेंद्रे, सागर बावनकर, जितेंद्र भगत उपस्थित होते. याप्रसंगी नवनियुक्त शाखेच्या कार्यकर्त्यांचे प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, पंचायत समिती सदस्य सौ. वनिताताई भांडारकर, जिल्हा सचिव महेंद्र नंदागवळी, तिरोडा तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने, तालुका उपाध्यक्ष रंजित बागडे, तालुका मीडिया प्रमुख तथा उपसरपंच बयवाडा महेंद्र भुरे, जागेश्वरजी भांडारकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच उदघाटना नंतर पक्ष मजबूती व संगठन वाढीबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करुन विविध समस्यांचे निराकरण व समाधान करण्यात आले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
