नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , तिरोडा तालुक्यातील सोनेखारी ची जिल्हापरिषद शाळा बंद दिनांक 13/07/2023 ची घटना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण. – जनता टाइम्स न्यूज

तिरोडा तालुक्यातील सोनेखारी ची जिल्हापरिषद शाळा बंद दिनांक 13/07/2023 ची घटना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

तिरोडा तालुक्यातील सोनेखारी ची जिल्हापरिषद शाळा बंद दिनांक 13/07/2023 ची घटना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण.

 

राकेश बोरकर
तालुका प्रतिनिधी तिरोडा
तिरोडा :- तिरोडा तालुक्यातील ग्राम पंचायत सोनेखारी येथे जिल्हापरिषद शाळेत वर्ग 1 ते 4 पर्यंत विद्यार्थी आहेत मात्र एकच शिक्षक असुन त्याला मिटिंग साठी तालुक्याच्या ठिकाणी जाणे असल्याने दिनांक ला 13/07/2023 ला शाळा बंद ठेवण्यात आली. प्रत्येक वेळी मिटींग दरम्यान वेळो-वेळी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठया प्रमाणात प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

शासनाने याची दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष धोक्यात आणून शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवण्याचे धोरण शासनाने, प्रशासनाने आखले असुन त्याची सुरुवात जिल्हापरिषद शाळेत शिक्षक भरती न करता स्वयंसेवक नेमणूकन करता शासन, प्रशासनाने सुरु केली आहे.

ग्रामीण भागातील आदिवासी, अनुसूचित जाती समाजातील बांधव तसेच कामगार, मजूर, गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवून कमकुवत करुन त्यांना बुद्धीने पंगू बनवण्याचे धोरण जिल्हापरिषद शासन, प्रशासन, महाराष्ट्र शासन यांनी आखले की काय असा सवालही या घटनेमुळे उद्भवला आहे. आज शाळा बंद असल्याने नुकसान झालेल्या शिक्षणाचा काय ? याला जबाबदारी कोणाची असा सवाल मोठ्या प्रमाणात पालक वर्गानी उपस्थित केला आहे. शासन प्रशासन यावर कोणती कारवाही करते याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed