तिरोडा तालुक्यातील घोगरा साझा क्र. १९ कोतवाल पद भरतीत प्रशासनाने लावली आसन क्रमांकाने सेटिंग अर्जदार पालकांचा आरोप.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

तिरोडा तालुक्यातील घोगरा साझा क्र. १९ कोतवाल पद भरतीत प्रशासनाने लावली आसन क्रमांकाने सेटिंग अर्जदार पालकांचा आरोप.
परीक्षार्थी यांना संभ्रम एकाच परिवारातील अर्जदारांना शैक्षणिक पात्रता वेग-वेगळी असून सारखेच गुण कसे निवड समिती अध्यक्ष, सचिव, जिल्हाधिकारी, व मुख्यमंत्री यांना केली चौकशीची मागणी.
राकेश बोरकर
तालुका प्रतिनिधी तिरोडा
तिरोडा :- कोतवाल पदभरतीची परीक्षा दिनांक ३० जुलै २०२३ ला उपविभागीय कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षेत घेण्यात आली. त्यात घोगरा साझा क्रमांक १९ मध्ये एकाच परिवारातील ३ अर्जदारांना समान गुण आल्याने परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची चर्चा परीक्षा देनाऱ्या अर्जदारात होत आहे. त्याचे कारण म्हणजे ज्यांचे गुण समान आहेत त्या परिवारातील अर्जदारांचे सर्वांचे आसन क्रमांक एका मागे एक होते. सर्वांची शैक्षणिक पात्रता वेग-वेगळी आहे तरी सुधा त्यांना एकसारखे गुण कसे आसन क्रमांकाने प्रशासन अधिकाऱ्यांनी सेटिंग केल्याचा तर्क लावण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी यांनी त्यांची उत्तर पत्रिका अर्जदारासमोर सखोल तपासून योग्य निर्णय द्यावा. परीक्षेत आसन क्रमांक अर्जदाराच्या नावाच्या किंवा आडनावाच्या पहिल्या अक्षराने देण्यात येते, मात्र यात योग्य पद्धत न आखता जसा वाटला मनमर्जिने सेटिंग करण्यासाठी लावण्यात आले असे आरोप अर्जदारांकडून होत आहे.
परीक्षेचे आसन क्रमांक कोणत्या पद्धतीने लावण्यात आले त्याची सुधा चौकशी करून नियमबाह्य कृत्य झाल्याचे निदर्शनास आल्यास घोगरा साझातील कोतवाल पदभरती रद्द करण्यात यावी. अशी मागणी परीक्षार्थी यांनी कोतवाल पदभरती समितीच्या अध्यक्ष/सचिव जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे. याकडे प्रकरणाकडे शासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देवून कार्यवाही करावी अशी मागणी अर्जदार व पालकवर्गात होत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
