नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , आमदार स्थानिक विकास निधी चे बांधकाम निकृष्ट दर्जाचे सोनोली गावातील नागरिकांचा आरोप बांधकाम थांबवून चौकशी करण्याची मागणी – जनता टाइम्स न्यूज

आमदार स्थानिक विकास निधी चे बांधकाम निकृष्ट दर्जाचे सोनोली गावातील नागरिकांचा आरोप बांधकाम थांबवून चौकशी करण्याची मागणी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

आमदार स्थानिक विकास निधी चे बांधकाम निकृष्ट दर्जाचे सोनोली गावातील नागरिकांचा आरोप बांधकाम थांबवून चौकशी करण्याची मागणी

 

राकेश बोरकर

तिरोडा तालुका प्रतिनिधी

तिरोडा :- आमदारांना आपल्या कार्यक्षेत्रात विकास कामे करण्यासाठी निधी दिला जातो व तो निधी आमदार ज्या गावात विविध विकास कामे अत्यावश्यक आहेत त्या ठिकाणी तो निधी आवशकते व ग्राम पंचायत च्या मागणीनुसार त्या कामावरती खर्च करतो.

तिरोडा तालुक्यात सोनोली येथे आमदार फंडातून सुरु असलेल्या रोडाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने गावातील नागरिकांनी या बांधकामावर आक्षेप घेऊन तो बांधकाम थांबवून त्याची गुणवत्ता तपासून संबंधित अभियंत्यावर कार्यवाही करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे. बांधकामाला संबंधित अभियंता यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली नाही त्याची कामावर देखरेख नाही असा आरोपही गावातील नागरिकांनी केलेला आहे.

निकृष्ट दर्जाचे रोडाचे बांधकाम थांबवण्यासाठी गेलेल्या नागरिकांना बांधकाम कंत्राटदार यांनी त्यांना उद्धट शब्दात उलट उत्तरे देत तुम्ही माझे काहीही करू शकत नाही मला वाट्टेल तसे काम करीन या भाषेत बोलल्याने गावातील नागरिक चांगलेच संतापले व काम बंद करुन संबंधित कंत्राटदार यांच्यावर कारवाहीची मागणी केली आहे.

सदर कंत्राटदार व अभियंता याच्यावर निकृष्ट दर्चाजे काम केल्याने कारवाही न झाल्यास आम्ही आंदोलनावर बसू अशी ताकीद माध्यमातून दिली आहे.

या वेळी प्रामुख्याने रुपेश वासनिक, विश्वनाथ मोहारे, अभिमन्नू लाडे, प्रवीण नारनवरे, दिनेश लाडे, योगेश मोहारे, प्रेम मोहारे, विष्णू लाडे, धर्मराज मोहारे व इतर गावकरी उपस्थित होते.

संबंधित प्रशासन यावर कोणती कारवाही करते याकडे आता गावातील सर्व नागरिकांचे लक्ष वेधून लागलेले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

आणखी कथा

You May Have Missed