गोंडमोहाळी येथिल परमात्मा एक वस्त्र भांडार ला दिनांक 02/09/2023 च्या पहाटे 3 ते 4 वाजता दरम्यान आग लागल्याने सर्व साहित्य जळून खाक 20 लाखाचे नुकसान

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

गोंडमोहाळी येथिल परमात्मा एक वस्त्र भांडार ला दिनांक 02/09/2023 च्या पहाटे 3 ते 4 वाजता दरम्यान आग लागल्याने सर्व साहित्य जळून खाक 20 लाखाचे नुकसान
राकेश बोरकर
तालुका प्रतिनिधी तिरोडा
तिरोडा :- गोंडमोहाळी येथिल परमात्मा एक वस्त्र भंडार ला दिनांक 02/09/2023 च्या पहाटे 3 ते 4 वाजता दरम्यान आग लागल्याचे नागरिकांच्या लक्ष्यात आल्या नंतर सर्वत्र आरडाओरळ झाली वा रात्रीच बोरवेल चे विहिरीचे पंप द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले त्याच बरोबर अग्निशमन दलाला सुद्धा पाचरण करण्यात आले होते परंतु तो पर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक आले होते.
परमात्मा एक वस्त्र भंडारचे मालक रोहित नामदेव येळे यांनी ग्राम पंचायत च्या कॉम्प्लेक्स मध्ये मागील 3 वर्षापासून किरायाने कमरा घेऊन त्यात लोन घेऊन आपले दुकान थाटले त्यात आपले व आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह चालवीत होते. परंतु आता त्यांच्या दुकानाला आग लागुन सर्व साहित्य जळून खाक झाल्याने त्यांच्यावरती मोठे आर्थिक संकट निर्माण झाले असुन कर्जबाजारी पणाने वा कश्या प्रकारे उदरनिर्वाह करायचा, कर्ज कसे फेडायचे असा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.
तलाठी, तहसीलदार, पोलीस प्रशासन यांनी घटना स्थळी येऊन चौकशी केली मात्र विद्युत विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी दिवस लोटून सुद्धा अद्यापही चौकशी करुन पंचनामा तयार केलेला नाही यावरून विद्युत विभाग सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांच्या सेवेसाठी तत्पर नसल्याचे दिसून येत आहे नागरिकांनी विद्युत विभागाच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त करत अश्या बेजबाबदार विद्युत विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाही व्हावी अशी मागणीची चर्चा सर्वत्र परिसरात सुरु आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
