नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , शासन, प्रशासनाला जागृत करण्यासाठी प्रहारने केला भजन-गायन जन आंदोलन – जनता टाइम्स न्यूज

शासन, प्रशासनाला जागृत करण्यासाठी प्रहारने केला भजन-गायन जन आंदोलन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

शासन, प्रशासनाला जागृत करण्यासाठी प्रहारने केला भजन-गायन जन आंदोलन

 

सात दिवसात मागणी मंजूर न झाल्यास करणार उग्र आंदोलन जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर

राकेश बोरकर

तिरोडा तालुका प्रतिनिधी

प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांच्या नेतृत्वात तिरोडा सुकडी नाका ते तहसील कार्यालया पर्यंत भजन्न दिंडी काढून तहसील कार्यालयासमोर शासन, प्रशासनाला वेळोवेळी पत्र, निवेदन देऊन कार्यवाही होत नसल्याने प्रहारच्या कार्यकर्त्यांनी भजन-गायनाच्या माध्यमातून यंत्रणेला जागृत करण्यासाठी जन आंदोलन करण्यात आले.

भजनाच्या माध्यमातून सरकार प्रशासनाला आग्रह करण्यात आला की,

कधी येशील मन मोहना !

पाहण्या भारत अमुचा पुन्हा !

स्वातंत्र्य पूर्वीचा भारत आणी आताच भारत परिस्थिती भजनाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली

या माध्यमातून विविध समस्या तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, व मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांना निवेदन देण्यात आले. त्यात प्रामुख्याने वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा योग्य मोबदला आणी संरक्षण देण्यात यावे, दिव्यांगांना प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत UDID कार्ड तयार करुन देण्यात यावे, दिव्यांगांना तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयात तपासणी करुन दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे, तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात गरोदर महिला व इतर नागरिकांसाठी नियमित सोनोग्राफी करीता डॉक्टराची नियुक्ती करण्यात यावी, अदानी कंपनीतून होत असलेले ओव्हरलोड कोळश्याचे, राखेच्या ट्रकापासून होणारा प्रदूषण थांबवून सुरळीत प्रदूषण मुक्त वाहतूक करण्यात यावी, रेतीची ट्रक द्वारे ओव्हरलोड होत असलेली वाहतूक थांबवून त्यावर तळपात्री झाकून वाहतून करण्यात यावी, सन 2017 पासून घरकुल लाभार्थ्यांना MREGS मार्फत न मिळालेले मजुरीचे पैसे मिळवून देण्यात यावे, रेती घाटातून अवैध रेतीचोरी व वाहतूक करणाऱ्या कंत्राटदार दोषी प्रशासन यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, मांडवी, घाटकूरोडा ते एलोरा पेपर मिल व कवलेवाडा ते बेलाटी बु. धादरी उमरी पर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करुन नविन दर्जेदार रस्ता निर्माण करणे, तुमसर एलोरा, घाटकूरोडा, मार्ग मांडवी तिरोडा ही बंद असलेली बस सेवा सुरु करण्यात यावी, धान खरेदी प्रकरणात दंड करण्यात आलेल्या संस्थेवर गुन्हे दाखल करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी, जिल्ह्यातील व तालुक्यातील पत संस्था मध्ये झालेल्या गैरव्यवहारात संचालक. मंडळावर गुन्हा दाखल करुन त्यांची संपत्ती जप्त करुन ठेवीदारांना पैसे मिळवून देण्यात यावे, सेवाहमी, दप्तर दिरंगाई कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अतिवृष्टी मुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पंचनामे तात्काळ करुन आर्थिक मोबदला. मिळवून देण्यात यावा, अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घराचे झालेल्या नुकसानीचा मोबदला देऊन त्यांना प्रधान्याने घरकुल देण्यात यावे, इत्यादी मागण्या चे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांना देऊन सात दिवसात मागण्या मंजूर न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल अशी ताकीद प्रहार पक्षातर्फे देण्यात आली.

यावे प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, प्रहारचे वरिष्ठ पदाधिकारी दिलीपजी जायस्वाल, पंचायत समिती सदस्य सौ. वनिताताई भांडारकर, कु. पल्लवी भेलावे, प्रल्हाद रणदिवे, प्रदीप निशाने, रुपेश वासनिक, विश्वनाथ मोहारे, महेंद्र नंदागवळी, दिनेश जागणित, सौ. रितु चौरे, दयालसिंग इळपाची, सौ. अनिता भोंडे, रोहिणी सातक, उरकूड उके, मोरेश्वर आगासे, अशोक वैद्य, मनीष भांडारकर उपसरपंच, युवराज रेवतकर, तर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नरेश ठवकर, राजु मेहर उपसरपंच, महेंद्र भुरे उपसरपंच, चंदू बडवाईक, सुधीर बावनथडे, कमल सोनटक्के, गुड्डू सोनेवाने, शुभम सोनेवाने, नाशिक धुर्वे, आशिष गौतम, भिमरावजी वासनिक, वामन हजारे, युवराज शेंद्रे, हितेश निनावे, मधुकर चोपकर, गोपाळ शेंडे, रतन खुलसिंगे, शेकडो कार्यकर्ते शेतकरी, नागरिक उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed