अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना (AIGDSU) तिरोडा चा न्याय मागण्यासाठी पोस्ट ऑफिस कार्यालया समोर धरणे आंदोलन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना (AIGDSU) तिरोडा चा न्याय मागण्यासाठी पोस्ट ऑफिस कार्यालया समोर धरणे आंदोलन
मागणी मान्य न झाल्यास 5/12/2023 ला जाणार अनिश्चित कालीन संपवार, डी. डी. टेंभेकरे.
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
तिरोडा :- अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना (AIGDSU) तिरोडा चा विविध मागण्यासाठी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला.
त्यात प्रामुख्याने ग्रामिण डाक सेवक यांना 8 तासाचा काम देऊन पेन्शन लागू करा, कमलेश चंद्रा कमेटीच्या शिफारशी लागू करा, अ) 12-24-36 पे प्रमोशन, ब) 5 लाख ग्रॅज्युटी, क) 5 लाख ग्रुप इन्शुरन्स, ड) 180 दिवसाचा पेड लिव्ह व ग्रामिण डाक सेवक यांच्या परिवाराला मेडिकल सुविधा पुरविण्यात याव्या. 3) IPPB, PLI, RPLI, सेव्हिंग स्कीम व मनरेगा वर्क लोड मध्ये समाविष्ठ करा आणि इतर नविन योजना डिपार्टमेंट राबवत आहे उदा. नव नविन विमा कंपनीचे हे सर्व काम आमच्या वर्कलोड मध्ये लागू करा.
टार्गेटची शक्ती कमी करुन कमिशन प्रणाली बंद करण्यात यावी. इत्यादी मागण्या धरून एक दिवशीय देशव्यापी संप पुकारण्यात त्यात गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नारेबाजी करत मागन्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
त्या प्रसंगी श्री. पी. जी. डोंगरे, डी. डी. टेंभेकरे, अनिल पाटील, माने, बागरे, बागडे, कु. निशा बिसेन, जयश्री टेकाम, दुर्गा पाडे, रहांगडाले मॅडम, व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
