3 वर्षापासून योजना पूर्ण नळाला एकही बुंद पाणी नाही शासनाची योजना ठरली फोल करोडो रुपये खर्च 7 दिवसात पाणी पोहचवा प्रहारचे सरपंच, सचिव, बीडीओ कार्यकारी अभियंता यांना निवेदन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

3 वर्षापासून योजना पूर्ण नळाला एकही बुंद पाणी नाही शासनाची योजना ठरली फोल करोडो रुपये खर्च 7 दिवसात पाणी पोहचवा प्रहारचे सरपंच, सचिव, बीडीओ कार्यकारी अभियंता यांना निवेदन.
गोंदिया तालुक्यातील दांडेगाव येथिल प्रकार जन प्रतिनिधिचा आशीर्वाद की दुर्लक्ष
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
गोंदिया :- महाराष्ट्र शासनाने जल जीवन मिशन अंतर्गत हरघर-जल ही योजना नव्याने कार्यान्वित केली त्यापूर्वी ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रनेच्या व योजनेच्या माध्यमातून करोडो रुपयाचे कामे नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी केलेले आहेत, मात्र अद्यापही एकही बुंद पाणी त्या नळाला आलेला नाही, करोडो रुपयाचे शासनाचे पैसे संबंधित यंत्रनेने दुर्लक्ष केल्याने धुळीस गेलेले आहेत या सर्व प्रकारची चौकशी करुन दोषी वरती कार्यवाही न करतात अर्धे तुम्ही अर्धे आम्ही असे धोरणचित्र दिसत आहे. असाच एक प्रकार दांडेगाव हेटिटोला येथे उघडकीस आला आहे पाणीपुरवठा योजनेचे काम 3 वर्षापासून पूर्ण झालेले आहे. मात्र एकहीबुंद पाणी नळाला आलेला नाही. त्यावर आता बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्ष शाखा दांडेगावच्या वतीने 7 दिवसात पाणी पोहचवा अन्यथा रस्त्यावर उतरू आंदोलन करू अशी ताकीद चे निवेदन दांडेगावचे सरपंच पंकज अंबुले, सचिव, गट विकास अधिकारी, पंचायत समिती गोंदिया. कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद यांना दिले आहे. प्रशासकीय यंत्रणा यावर कोणती कार्यवाही याकडे आता दांडेगाव ग्राम वासियांचे लक्ष वेधून आहे.
यावेळी निवेदन देतांना प्रहार जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, शाखा अध्यक्ष दयालसिंग इळपाची, शाखा सचिव रितु चौरे, सहसचिव सुनीता जागणित, प्रहार कार्यकर्ते महेंद्र नंदागवळी, दिनेश जागणित, सुप्रिया लांजेवार, अनिल बावणे, निलेश पवार, विदेश चौरे, नागोराव राऊत, अजय खानोरकर उपस्थित होते.
यावर प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी प्रतिक्रिया देतांना कळविले आहे की, जिल्ह्यात असे अनेक गावे आहेत की त्यात करोडो रुपये खर्च करुन पाणी नळा पर्यंत पोहचले नाही यास यंत्रणा दोषी आहे. जन प्रतिनिधिंना याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. 7 दिवसात हेटिटोला (दांडेगाव) येथे योजनेचा नळाला पाणी पोहचवा अन्यथा शासनाला पैसे परत करा. वेळ पडल्यास उच्च न्यायालयात जिल्ह्यातील या भोंगळ कारभारावर दाद मागू असेही यावेळी कळविण्यात आले.
जल जिवन मिशनचे काम करणारे कंत्राटदार सरपंच, गावकरी यांना जुमनात नाही फक्त अधिकारी, कर्मचारी यांना धरून अर्धे तुम्ही अर्धे आम्ही असा कयास जनतेत आहे. हर घर जल, हर घर नल ही योजना अधिकारी कंत्राटदार घर भर योजना आहे का ? असाही आरोप या वेळी भांडारकर यांनी केला आहे. या योजनेत सुद्धा हर घर नल केले मात्र ज्यांना पाणी प्यायचे नाही त्यासाठी तिरोडा तालुक्यातील सोनोली येथे असा प्रकार आहे. हर घर नल आहे परंतु नळात बाटलीने पाणी टाका असा शासनाचा प्रशासनाचा धोरण आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
